Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही.
मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. त्यामुळे आता सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि एकनाथ शिंदेंचं उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं आणि तुम्ही सांगाल तर मुख्यमंत्रिपद सोडून देईन असा विश्वास दिला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच्या सर्व आमदारांची बैठक घेतली आणि विरोध आणखी तीव्र केला. “हिंदुत्त्व फॉरएव्हर” अशा आशयाचं ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं.
गुलाबराव पाटलांसह चार आमदार गुवाहाटीत
दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (22 जून) त्यांच्या गटात आणखी चार आमदार सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे शिंदे गटात सामील झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच इतर आमदारांनी त्यांचं स्वागत केलं. शिवाय एकनाथ शिंदे देखील यावेळी उपस्थित होते.
VIDEO : Shinde vs Thackeray : शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळतोय
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Maharashtra #Political #Crisis #शवसनच #आणख #सह #आमदर #नट #रचबल