Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra HSC Result date 2021 : आज बारावीचा निकाल; आज दुपारी 4...

Maharashtra HSC Result date 2021 : आज बारावीचा निकाल; आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार


Maharashtra HSC Result 2021 Date Time : काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.  

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. 

बोर्डाच्या खालील अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

दरम्यान, बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #HSC #Result #date #आज #बरवच #नकल #आज #दपर #वजत #जहर #हणर

RELATED ARTICLES

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

आंबट ढेकर, छातीत जळजळ, अपचन मुळापासून दूर करणारी टिप्स

Acid reflux home remedy :लठ्ठपणा, धुम्रपान, जास्त खाणे, कॅफिनचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही औषधे ही स्थिती वाढवू शकतात. या समस्येवर...