Friday, August 12, 2022
Home भारत Maharashtra Corona Cases : राज्यात आज 4869  रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना...

Maharashtra Corona Cases : राज्यात आज 4869  रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई : राज्यात आज  4,869 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे.

राज्यात आज कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75  हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (82) वाशिम (89), गोंदिया (97), गडचिरोली (16)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नंदूरबार, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,83,52,467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,15,063 (13.6 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,61,637 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,311 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. सध्या मुंबईत 4744 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1500 दिवसांवर गेला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 40,134 कोरोनाबाधितांची नोंद

सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 40,134 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 422 रुग्णांनी जीव गमावला आहे. काल (रविवारी) केरळमध्ये सर्वाधिक 20,728 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Corona #Cases #रजयत #आज #रगणच #नद #तर #रगणन #डसचरज

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

Pune Mumbai Railway Stranded Landslide : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई, पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी... खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर...

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...