Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra Breaking News 24 June 2022 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News 24 June 2022 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी ‘एबीपी माझा’ आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी… या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय.  भरत गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, असं पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलंय. 12 आमदारांना कारवाई करण्याचं पत्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा पत्र लिहित भरत गोगावलेच आमचे प्रतोद आहेत असं म्हटलंय. त्यामुळे एकनाथ  शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय.

अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी

दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. परबांना आज ११ वाजता पुन्हा चौकशीला बोलावलंय. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे.

द्रौपदी मुर्मू  आज उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी  एनडीएने   द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू आज दुपारी 12.30 वाजता  आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी 20 नावांवर चर्चा केली. त्यानंतर पूर्व भारतातील आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रौपदी मुर्मू भाजपच्या उमेदवार आहेत.

अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषीत केलेल्या अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार आहे.

जुग जुग जियो आज प्रदर्शित होणार

दिग्दर्शक करण जोहरचा  जुग जुग जियो  हा चित्रपट आज  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नितू कपूर  हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो.

आज शमशेराचा ट्रेलर लॉन्च होणार

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  सध्या ‘शमशेरा’  सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त  आणि वाणी कपूरदेखील दिसणार आहे. आज शमशेराचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Breaking #News #June #रजयतल #महततवचय #घडमड #एक #कलकवर

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला...

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद का बरखास्त झाली? ‘ही’ आहेत कारणं

Maharashtra State Wrestling association : भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद...

मशरूमच्या या फोटोंमध्ये लपलाय एक उंदीर, तुमच्या नजरेला सापडतोय का?

नुकतंच व्हायरल झालेल्या Optical Illusion फोटो असंच काही आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

तीव्र डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष नको; मेंदुचा हा गंभीर आजार झालेला असू शकतो

मुंबई, 02 जुलै : अनेकजण डोकेदुखीचा त्रास होत असताना डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतात. अशा स्थितीत दुखण्यात काही काळ आराम मिळतो. पण,...

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...