Saturday, August 20, 2022
Home भारत Maharashtra Breaking News 02 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त...

Maharashtra Breaking News 02 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर…


ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी… या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार

सध्या गोव्यातल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणारे शिंदे समर्थक आमदार आज मुंबईत परतणार आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आज हे आमदार मुंबईत येतील. 3 आणि 4 जुलैला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी हे आमदार येत आहेत. कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे. त्यांना मुंबईत ऑबेरॉय हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. 

एकनाथ शिंदेंविरोधात कारवाई, शिवसेना नेतेपदावरुन काढलं

पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. 

विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार

 सध्या राष्ट्रवादीच्या वतीने संख्याबळ जास्त असल्यामुळे आमचाच विरोधी पक्ष नेता असेल असा मोठया प्रमाणात दावा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी पक्षनेते पदासाठी जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
 
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

आज दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, महाविकास आघाडी आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.  
 
राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी लिस्ट पाठवली जाणार

राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदार नवी लिस्ट पाठवली जाणार आहे.  महाविकास आघाडीने 12 राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी लिस्ट पाठवली होती. ती विद्यमान राज्यपाल कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती. आता नवं सरकार नवी लिस्ट पाठवणार आहे. 

पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट

 कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा असल्यानं चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

आषाढी वारी

आज ज्ञानेश्वरांची पालखी फलटण मुक्कामी राहणार आहे.  तुकारामांची पालखी निमगाव केतकीहून निघेल आणि इंदापूरला मुक्कामी असेल. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Breaking #News #July #रजयतल #घडमडच #परतयक #अपडट #फकत #एक #कलकवर

RELATED ARTICLES

रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...

काय म्हणता? प्रवाशांचा डेटा विकून इंडियन रेल्वे पैसे कमावणार! IRCTCच्या नव्या टेंडरमुळं चर्चा

IRCTC Sell User Data: आजकाल आपल्या डेटावर कधी कुणी हक्क सांगेन याबाबत सांगता येत नाही. तसंही डिजिटलच्या युगात...

कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : जगभरात २०१९मध्ये ४४.५ लाख कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे धूम्रपान, मद्यपान, उच्च स्तरावरील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यांसह अन्य जोखीम घटक कारणीभूत आहेत,...

Most Popular

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

Star Pravahवर रंगणार धम्माल म्युझिकल शो; ‘ही’ मालिका होणार बंद

मुंबई, 19 ऑगस्ट : टेलिव्हिजन विश्वात सध्या स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ठरली आहे. स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस...

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : जगभरात २०१९मध्ये ४४.५ लाख कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे धूम्रपान, मद्यपान, उच्च स्तरावरील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यांसह अन्य जोखीम घटक कारणीभूत आहेत,...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...