Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra: आ. नितीन देशमुखांची 'ती' सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता, बंडाला नवे...

Maharashtra: आ. नितीन देशमुखांची ‘ती’ सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता, बंडाला नवे वळण


Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख माघारी परतले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे या वादाला आता नवे वळण लागणार आहे.

ती स्वाक्षरी माझी नाही, बोगस आहे – आमदार नितीन देशमुख

शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आपली स्वाक्षरी इंग्रजीत असून त्या पत्रावर बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरीलसही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेच्या गॅझेटियरमध्ये आमदार नितीन देशमुखांचं नाव ‘नितिन भिकनराव टाले’ असं आहे. या पत्रावरील देशमुखांची सही ‘नितीन देशमुख’ अशी मराठीत असल्याचं दिसत आहे. त्यांना नितीन देशमुख या नावानं ओळखलं जातं. 

भाजपचे एकनाथ शिंदेंना हाताशी धरून षडयंत्र – नितीन देशमुख
आमदार देशमुख यांनी अकोल्यात परतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. भाजपमध्ये धमक असेल, तर निवडणुका लावाव्या व जनतेसमोर जावे. आता निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देतील. मी सच्चा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे’. गटनेत्यांनी बैठक बोलावली म्हणून मी आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह एकनाथ शिंदेंकडे गेलो. आम्हाला माहित नसताना गुजरातकडे नेलं जात होतं. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील पळालेत. गुजरातच्या हॉटेलला छावणीचं रुप आले होते. 250 ते 300 पोलिसांचा ताफा होता. त्यात आयपीएस अधिकारीही होते. हॉटेलमध्ये भाजपचे नेते होते. मोहित कंबोज, आमदार संजय कुटे होते. भाजपनं एकनाथ शिंदेंना हाताशी धरून षडयंत्र रचल्याची कल्पना आली. पोलिसांसोबत वाद झाले. मी तेथून पळ काढला. आपल्याला पळ काढल्यानंतर एका गाडीत टाकण्यात आलंय. मला काहीच झालेलं नसताना गाडीत टाकण्यात आलंय. दवाखान्यात डॉक्टरनं अटॅक आलेला नसतांनाही तसं सांगण्यात आलं. ठाकरे, शिवसैनिकांचा विचार करून एकनाथ शिंदे व आमदारांनी परत यावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.  

जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात इंजेक्शन टोचलं
याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, “माझी तब्येत टकाटक आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं.  तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं. मला काही झाले नसताना इंजिक्शन देऊन घातपात करण्याचं षडयंत्र होते. 

गुवाहाटीवरून थेट अकोल्यात
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख काल अकोल्यातील आपल्या घरी पोहचलेत. आमदार देशमुख गुवाहाटीवरून थेट काल अकोल्यात पोहोचलेत. यावेळी सुधीर कॉलनी भागातील त्यांच्या घरी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. रांगोळ्या काढून आणि औक्षण करीत कुटूंबियांनी त्यांचं स्वागत केलंय. दरम्यान, नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी सिव्हील लाईन पोलिसांत आपले पती हरलिल्याची तक्रार केली होती.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप 

Uddhav Thackeray : कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, ‘वर्षा’ते ‘मातोश्री’ दरम्यान शिवसैनिकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #आ #नतन #दशमखच #त #सह #ततरक #मददयत #अडकणयच #शकयत #बडल #नव #वळण

RELATED ARTICLES

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Most Popular

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

VIDEO : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले ‘एकनाथ’

मुंबई, 7 जुलै : सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश...

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार?

मुंबई, 6 जुलै : ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही शिवसेना पक्षाचं विघ्न संपत असल्याचं दिसत नाही. कारण, पक्षाला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...