Saturday, November 27, 2021
Home भारत LPG Price : आजपासून LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला

LPG Price : आजपासून LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला


नवी दिल्ली : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना अनुदानीत एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू होणार आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 859.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या अगोदर 1 जुलैला सिलेंडरचे दरात  25.50 रुपयांनी वाढ झाली होती. 

 या वर्षी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 165 रुपयांची वाढ

जून महिन्यात दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत  किंमत 809 रुपये होती. त्यानंतर 1 जुलैला सिलेंडरचे दरात वाढ होत किंमत 834 रुपये झाली. दरम्यान 1 जानेवारीपासून आजपर्यंतच्या दर बघितले तर गेल्या आठ महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत 165 रुपयांची वाढ झाली आहे. 

देशातील मुख्य शहरातील सिलेंडरचे दर

 दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 886 रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 859.50  रुपये असणार आहे. लखनौमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 897.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत. 

 घरगुती गॅससोबतच 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही 68 रुपयांनी वाढलेत. यापुर्वी 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.

तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीची दर महिन्याला नोंद ठेवते आणि त्यानंतर किंमत वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते. प्रत्येक राज्यात टॅक्स वेगवेगळा असल्याने सिलेंडरच्या दर कमी जास्त बघायला मिळतात. 

संबंधित बातम्या :

Cylinder Man : सोशल मीडियाने कॉमन मॅन सागरला रातोरात बनवलं ‘सिलेंडर मॅन’

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#LPG #Price #आजपसन #LPG #सलडर #रपयन #महगल

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...