Thursday, December 2, 2021
Home लाईफस्टाईल Long Life : 'या' गोष्टींचे पालन करणारी लोकं ५०शीनंतरही राहतात फिट, प्रत्येक...

Long Life : ‘या’ गोष्टींचे पालन करणारी लोकं ५०शीनंतरही राहतात फिट, प्रत्येक आजारापासून मिळते कायमची मुक्ती


एक व्यक्ती किती काळ जगेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तसेच प्रत्येक व्यक्ती ही किती वर्ष जगेल हे पहिल्यापासूनच ठरलेलं असतं असं बोललं जातं. पण हे सारं काही पहिल्यापासूनच ठरलेलं असलं तरी आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवायचं हे आपल्या हातात असतं. जर तुम्ही सतत चुकीच्या पद्धतीने जीवन जगत असाल किंवा वाईट सवयींचाच तुम्ही पाठलाग करत असाल तर निरोगी आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तुमच्या काही चुकांमुळे आयुष्यभर काही आजारांना तुम्ही बळी पडता.

पण जर नेहमीच्या दिनक्रमामध्ये, जीवनशैलीमध्ये काही बदल केले तर निरोगी आयुष्य तुम्ही नक्कीच जगू शकता. अलिकडेच जर्नल फ्रंटियर्स इन एजिंग न्युरोसायन्सद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केल्यास अधिक काळ जगण्यावर याचा किती परिणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला. या संशोधनामधून एक गोष्ट समोर आली की जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केले तर तुम्ही अधिक काळ जगू शकता. पण या सवयी कोणत्या आणि संशोधनामधून नेमकं काय सिद्ध झालं आहे हे पाहूया.

​संशोधन काय म्हणतं?

एका संशोधनानुसार झोप आणि दीर्घ काळ निरोगी आयुष्य याचा एकमेकांशी संबंध आहे. या संशोधनानुसार तीन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

– वयोवृद्ध लोकांऐवजी कमी वयोगटातील व्यक्तींच्या तुलनेमध्ये झोप मंद गतीने येते.

– वयोवृद्ध व्यक्ती ज्या काटेकोरपणे झोपेच्या वेळेचं पालन करतात.

– या लोकांमध्ये लिपिड प्रोफाइलचा समावेश असणं.

लिपिड प्रोफाइल म्हणजे ही एका प्रकारची रक्त चाचणी आहे. या तपासणी द्वारे शरीरामधील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड किती आहे याची माहिती मिळते. शरीरामध्ये ट्रायग्लिसराइडचे प्रमाण अधिक झाले की हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो. पण जर तुम्ही उत्तम झोप घेत असाल तर या समस्येपासून तुम्हाला दूर राहण्यास मदत मिळू शकते.

(Celebrity Exercise Tips : ५०शी ओलांडल्यानंतरही सुपरहॉट अभिनेत्रीने मिळवली टोंड फिगर, वर्कआउट करतानाचा व्हिडिओ पाहून म्हणाल…)

टीव्ही किंवा इतर उपकरणांचा वापर टाळा

निरोगी आयुष्यासाठी उत्तम झोप ही महत्त्वाची असते. डॉक्टर देखील किमान ८ तास नियमित झोपलं पाहिजे आणि झोप घेणं महत्त्वाची असा सल्ला देतात. उत्तम झोप मिळाल्यास तुम्ही फ्रेश तर राहता पण त्याचबरोबरीने बऱ्याच आजारांपासूनही तुम्ही दूर राहू शकता. जर तुम्हाला अधिक काळ जगायचं असेल आणि निरोगी आरोग्य हवं असेल तर तुमच्या रुममध्ये देखील थंड वातावरण ठेवा. तुमच्या रुममध्ये टीव्ही किंवा इतर उपकरणं ठेऊ नका. तसेच झोपेच्या वेळेमध्ये या उपकरणांचा वापर देखील करणं टाळा.

(Weight Gain Tips : ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण, तब्बल १५ Kg वजन वाढवल्याने सडपातळ मुलांसाठी ठरतोय आदर्श)

रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टींचे सेवन करणं टाळा

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कॅफीन, निकोटीन आणि धूम्रपानाचे सेवन करत असाल तर याचा तुमच्या झोपेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबरीने तुमच्या निरोगी आरोग्यावर देखील अनेक परिणाम होतात. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी धूम्रपानाचे सेवन करणं टाळा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी अधिक मसालेदार पदार्थांचे सेवन करणं टाळा. अधिक तिखट आणि मसालेदार पदार्थांचा आहारामध्ये समावेश असेल तर याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. परिणामी झोप पूर्ण झाली नाही की आरोग्यावर याचा परिमाण होतो.

(‘या’ गंभीर आजाराशी लढतेय शिल्पा शेट्टीची बहीण, साधे खाद्यपदार्थ खाणंही झालं कठीण)

​झोपेची वेळ निश्चित करा

निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील काही बदल केले पाहिजेत. तसेच काही चांगल्या सवयींचे देखील पालन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ तुम्ही निश्चित करा. आणि निश्चित केलेल्या वेळेचं पालन देखील करा. तरच तुम्ही ७ ते ८ तास झोप पूर्ण करू शकता. उत्तम झोप तुमच्या शरीरासाठी फार महत्त्वाची आहे. यामुळे तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकता. तसेच शारीरिक थकवा देखील जाणवत नाही.

(Brain Health : नेहमीच्या ‘या’ सवयींमुळे मेंदूवर होतोय परिणाम, फक्त दिनक्रमामध्ये करा ‘हे’ ५ सोपे बदल)

​दिवसभरात झोपू नका

चांगल्या सवयी म्हणजे निरोगी आयुष्याचा सुखकर मार्ग. तुम्ही स्वतःसाठी काही नियम तयार करा आणि या नियमांचे पालन देखील करा. तुम्ही रात्री उत्तम झोप घेत असाल तर दिवसभरात तुम्ही झोपू नका. तरी देखील तुम्हाला दिवसभरामध्ये झोप येत असेल तर फक्त ३० मिनिटे झोपा. ३० मिनिटांच्यावर दिवसभरामध्ये झोपू नका. याचा पूर्ण परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्याचबरोबरीने रात्री झोपेच्या वेळामध्ये देखील खंड पडतो.

(Weight Loss Tips : ‘या’ ५ प्रकारच्या खिचडीमुळे झपाट्याने वजन होईल कमी, तुपाबरोबर सेवन केल्यास मिळेल दुप्पट फायदा)

​नेहमी सक्रिय राहा

आळास हा आपल्या आरोग्याचा पहिला शत्रु आहे. तुम्हाला सतत आळस येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. निरोगी आरोग्यासाठी तुम्ही दिवसभर शारीरिकरित्या सक्रिय असणं गरजेचं आहे. तुम्ही जर दिवसभर सक्रिय असाल, काम करत असाल तर रात्री झोप देखील उत्तम येते. तसेच शारीरिक ताण देखील हलका होतो. पण लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय राहू नका. तसेच डोक्यावरील ताण हलका कसा होईल याकडे लक्ष द्या. अधिक ताण शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो.

(Celeb Fitness : चक्क पाण्यामध्येच योग करतोय ‘हा’ अभिनेता, फिटनेस अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Long #Life #य #गषटच #पलन #करणर #लक #५०शनतरह #रहतत #फट #परतयक #आजरपसन #मळत #कयमच #मकत

RELATED ARTICLES

Omicron : भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे, पाहा काय म्हणाले आरोग्य तज्ज्ञ

मुंबई : ओमिक्रॉन (Omicron) कोरोना व्हेरिएंट आता भारतातही दाखल झाला आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत....

Friendship साठी एकमेकांच्या तोंडात करतात उलटी; घट्ट मैत्रीसाठी विचित्र पद्धत

मुंबई, 02 डिसेंबर : कुणाशी मैत्री (Friendship) करायची म्हणजे आपण हात मिळवतो करतो किंवा आलिंगन देतो. पण एकमेकांच्या तोंडात उलटी करून मैत्री केल्याचं तुम्ही...

तुमचा चेहराच बनेल बोर्डिंग पास, चार विमानतळांवर बसणार FTR यंत्र; वाचा सविस्तर

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: भारतातील विमानतळांवर आता बोर्डिंग पासऐवजी थेट तुमचा चेहरा (Facial identification technology to be introduced at four airports in India)...

Most Popular

Ashes Series: कांगारूंचा विकेटकीपर पेनची जागा घेणार ‘हा’ खेळाडू

Alex Careyऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्विवार्षिक ऍशेस सिरीजला(AUS vs ENG Ashes Series) सुरुवात होत आहे. नवी दिल्ली, 2 डिसेंबर: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्विवार्षिक...

फिट राहण्यासाठी Cycling करत आहात का? मग या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 02 डिसेंबर: हिवाळ्यात फिटनेस (fitness) राखण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे. या ऋतूत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हलक्या व्यायामासोबत सायकल चालवणं...

Bluetooth Earbuds: दमदार बॅटरी लाइफसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट इयरबड्स, किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी

एकेकाळी स्मार्टफोन्ससोबत वायर्ड इयरफोन्सचा प्रामुख्याने वापर केला जात असे. मात्र, आता वायर्ड इयरफोन्सची जागा ब्लूटूथ इयरबड्सने घेतलेली दिसत आहे. ग्राहक वायर्ड इयरफोन्स आणि...

Motivational Weight Loss Story : बापरे, 207 किलो वजन असलेल्या जुनैदला वडिलांनी दिला शेवटची ताकिद, फक्त 10 महिन्यांत घटवलं तब्बल 100 किलो वजन!

सहसा लोक वजन कमी करताना लहान लहान ध्येयेच ठेवतात. बहुतेक लोकांना फक्त 5 ते 10 किलो वजनच कमी करायचे असते. त्याचवेळी असे काही...

खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घ्यावी

मुंबई, 02 डिसेंबर : असे अनेक खाद्य पदार्थ आहेत ज्यात हिंग (Asafoetida) टाकल्याने त्यांची चव अनेक पटींनी वाढते. काही शारीरीक समस्या कमी करण्यासाठीही हिंग...

Live Updates: कॉंग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष – बाळासाहेब थोरात

HIGHLIGHTSराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांचा, नगरसेवकांचा प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत...