मुंबई, 2 जुलै : काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) सुरू होण्याआधीच मोठा वाद निर्माण झाला आहे. आता बीसीसीआयने (BCCI) आयसीसीला (ICC) पत्र लिहून 6 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या टी-20 स्पर्धेला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे. क्रिकईन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने या लीगचं आयोजन काश्मीरमध्ये न करण्याचंही या पत्रात लिहिलं आहे. याआधी शनिवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय आमच्या अंतर्गत मुद्द्यात दखल देत आहे, असा आरोप केला होता.
बीसीसीआय परदेशी खेळाडूंना लीगमध्ये सामील होण्यापासून रोखत आहे, तसंच आयसीसीच्या सदस्यांसोबतही बीसीसीआय संपर्कात आहे, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती.
काश्मीर प्रीमियर लीगवरून BCCI ने पाकिस्तानला दिलं सडेतोड प्रत्युत्तर
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) यानेही बीसीसीआयवर आरोप केले. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये भाग न घेण्यासाठी बीसीसीआय खेळाडूंवर दबाव टाकत आहे, असा आरोप गिब्जने केला आहे. पाकिस्तानसोबत आपला राजकीय अजेंडा राबवला जात आहे, काश्मीर प्रीमियर लीग खेळू नये म्हणून बीसीसीआय अशा गोष्टी करत आहे, ज्याची गरज नाही. क्रिकेटसंबधी कोणत्याही गोष्टींसाठी भारतात येऊ देणार नाही, अशी धमकीही मला दिली जात आहे, हे चुकीचं आहे, असं ट्वीट हर्षल गिब्जने केलं.
आता बीसीसीआयने आयसीसीशी या मुद्द्यावरून संपर्क केल्याचं समोर आलं आहे. काश्मीर सध्या वादग्रस्त प्रदेश आहे. दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे, अशा ठिकाणी क्रिकेट मॅच खेळल्या जाऊ शकतात का? असा सवाल बीसीसीआयने आयसीसीला लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.
काश्मीर प्रीमियर लीग : शाहिद आफ्रिदी परत बरळला, BCCI वर केले आरोप
काश्मीर प्रीमयिर लीगचं आयोजन 6 ऑगस्टपासून होणार आहे. या लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान यांच्यासारखे मोठे खेळाडूही खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स या 6 टीम सहभागी होणार आहेत. काश्मीर प्रीमियर लीगच्या टीमचं नेतृत्व इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल करणार आहेत. प्रत्येक टीममध्ये पाकव्याप्त काश्मीरमधले 5 क्रिकेटपटू असतील.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#KPL #कशमर #परमयर #लगच #वद #वढल #BCCI #च #ICC #ल #पतर