<p>बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील शिरोळमध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. बैलगाडी मालक-चालक संघाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बैलाला जंगली प्राण्यांच्या वर्गवारीतून मुक्त करण्याची मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. तर तिकडे नगर-मनमाड महामार्गावर राहुरीत शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. पेटा हटवा, बैल वाचवा अशी मागणी करत शेतकरी रस्त्यावर उतरले. बैलाला वाचवण्यासाठी शर्यती सुरु करण्याची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Kolhapur #पट #हटव #बल #वचव #बलगड #शरयत #चल #करणयचय #मगणसठ #शरळमधय #बलगड #मरच