Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Know the theme, history and significance of International Olympic Day 2022 vkk...

Know the theme, history and significance of International Olympic Day 2022 vkk 95International Olympic Day 2022: मानवी जीवनात खेळांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मनोरंजन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी जगभरात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. या विविध खेळांना आणि खेळाडूंना एकाच छताखाली आणण्यासाठी दर चार वर्षांतून एकदा खेळांच्या कुंभमेळ्याचे अर्थात ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत जगभरातील हजारो खेळाडू सहभागी होतात. खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस आणखी वाढत जावो यासाठी दरवर्षी २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, आज जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा होत आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी एक वेगळी थीम निश्चित केली जाते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवसासाठी, ‘एकत्र, शांत जगासाठी’ (Together, For a Peaceful World) अशी थीम ठेवण्यात आली आहे. लोकांना शांततेत एकत्र आणण्याची ताकद खेळामध्ये असते. युक्रेन-रशियन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही थीम निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा – आपल्याच संघाविरोधात खेळणार ‘हे’ खेळाडू, लीसेस्टरशारयच्या संघात चार भारतीयांचा समावेश

वय, लिंग, वंश किंवा धर्म यांची पर्वा न करता जगभरातील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात ठिकठिकाणी ऑलिंपिक खेळांविषयी प्रदर्शने आणि शैक्षणिक चर्चासत्रेही आयोजित केली जातात.

आधुनिक ऑलिंपिक खेळांचे आयोजन, प्रचार आणि नियमन करण्यासाठी २३ जून १८९४ रोजी पॅरिसमधील सोर्बोन येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची (आयओसी) स्थापना करण्यात आली होती. त्या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा होतो. आयसीओ सदस्य डॉक्टर ग्रुस यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ४१व्या हंगामात ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिना’ची संकल्पना मांडली होती. यानंतर २३ जून १९४८ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांना या कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली होती.

गेल्या दशकभराच्या काळात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने अनेक देशांना आणि त्या देशांतील हजारो खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#theme #history #significance #International #Olympic #Day #vkk

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

जिन्स पँटच्या पाठीमागच्या खिशात फोन ठेवताय?, ‘या’ ५ समस्याला तुम्ही निमंत्रण देताय

never keep phone in your back pocket : रस्त्यांवरून जात असताना आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या मागच्या खिशात ठेवलेला स्मार्टफोन आपल्याला बऱ्याच वेळा दिसला...

बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही

मुंबई :विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन यांच्यातील लढत कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम लढत मानली जाते. टीम इंडियाच्या २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना अँडरसनने विराटला...

1st July 2022 Important Events : 1 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

1st July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; जाणून घ्या कोण आत, कोण बाहेर

मुंबई : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यजमान संघाविरुद्ध पाचवी आणि निर्णायक सामन्यातून बाहेर पडलेला रोहित शर्मा...

विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे

Assembly session : विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि...

मासे खाणाऱ्यांना ‘हे’ आजार कधीही होत नाहीत, याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या

मुंबई : वेज आणि नॉनवेज असं दोन प्रकारचं अन्न खाणारे लोक असतात, हे तर आपल्याला माहित आहे. त्यात बरेचसे असे नॉनवेज खाणारे लोक...