Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Ketaki Chitale : शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

Ketaki Chitale : शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल


Ketaki Chitale  Facebook Post : मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. 

सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटे यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. 

अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली. नुकतंच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर त्यावरुन भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीनं ही पोस्ट केली आहे.

आता शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. 

‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

संबंधित बातम्या

Chhava The Great Warrior : ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ सिनेमा लवकरच प्रदर्शित

Sundar Amche Ghar : ‘सुंदर आमचे घर’ मालिकेत काव्याच्या ‘काव्यागिरीला सुरुवात



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Ketaki #Chitale #शरद #पवरवषय #आकषपरह #पसट #कतक #चतळवरधत #गनह #दखल

RELATED ARTICLES

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Most Popular

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने...

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

हाय गर्मी ! , तुमच्या मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा

वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होत असतो. लहानमुलींचे प्रतिकार शक्ती कमी असल्याने जर वातावरणात जर काही बदल झालेच तर त्याचा थेट...

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3...

Sony Smart TV: घरच बनेल थिएटर! Sony ने भारतात लाँच केले मोठ्या स्क्रीनसह येणारे ५ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स-किंमत

नवी दिल्ली : Sony Smart TV Launched: Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीचा लेटेस्ट ४के स्मार्ट टीव्ही लाइनअप...