Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या Ketaki Chitale : केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, कोर्टात...

Ketaki Chitale : केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?


Ketaki Chitale Live Update :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.  केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली.  गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत. 

केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं. 

केतकीवर आतापर्यंत राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान केतकी चितळेला आज कोर्टात हजर करण्यात आलं.

केतकी चितळेच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

  

शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं

शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं आहे.  केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं विकृती, सर्वपक्षीयांकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्रमक भूमfका घेण्यात आली आहे. दरम्यान केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवारांनी मी केतकीला मी ओळखत नसल्याचे काल म्हटलं. सर्व स्तरांतून केतकीच्या पोस्टचा  विरोध केला जात असून राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केतकीची चूक असल्याचं म्हटलं आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Ketaki #Chitale #कतक #चतळल #म #परयत #पलस #कठड #करटत #नमक #कय #घडल

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...