Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे...

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल


Ketaki Chitale Issue :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीवर आतापर्यंत नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 

दरम्यान केतकी चितळेला आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यानंतर केतकीला दिलासा मिळतो की अडचणी वाढणार याकडं लक्ष लागलं आहे. केतकी चितळेच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आज केतकीला घेऊन पोलीस कोर्टात दाखल झाले आहेत. ठाणे कोर्टाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच इतर पदाधिकारी जमायला सुरुवात केली आहे. काही वेळात न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

अकोला पोलिस घेणार केतकीला ताब्यात?.  
या प्रकारानंतर अकोल्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांना खदान पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर केतकी हिच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  केतकीच्या आक्षपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली जात आहे. अकोल्यात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केतकीच्या कृत्यावर टीका केली. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार देत, तिच्यावर कारवाईची मागणी केली. या तक्रारीनंतर खदान पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  सद्यस्थितीत या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अन् याचा अधिक तपास खदानच्या हेड कॉन्स्टेबल जयश्री कुंबारे करीत असून आवश्यकता भासल्यास केतकी चितळे हिला ताब्यात घेतले जाणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली.

शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं

शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं आहे.  केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं विकृती, सर्वपक्षीयांकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्रमक भूमfका घेण्यात आली आहे. दरम्यान केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मी केतकीला मी ओळखत नसल्याचे पवारांनी काल म्हटलंय. सर्व स्तरांतून केतकीच्या पोस्टचा  विरोध केला जात असून राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केतकीची चूक असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले…

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

Sharad Pawar: शरद पवारांवरील विखारी टीकेमागे भाजप-संघाचं पाठबळ; राष्ट्रवादीचा आरोपअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Ketaki #Chitale #कतक #चतळचय #अडचणत #वढ #रजयत #वगवगळय #ठकण #अनक #गनह #दखल

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने...

Nana Patole Full : मी शिवसेनेचा सामना वृत्तपत्र वाचत नाही, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?

<p>Nana Patole Full : मी शिवसेनेचा सामना वृत्तपत्र वाचत नाही, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Smartphone Offers: फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल, १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : Flipkart Big Bachat Dhamaal Sale : चांगल्या फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडे जास्त पैसे खरेदी करावे लागतात. मात्र,...

Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प

<p>Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...