Friday, August 12, 2022
Home करमणूक Ketaki Chital:माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते-केतकी चितळे

Ketaki Chital:माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते-केतकी चितळे


मुंबई, 01 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale) अटक करण्यात आली होती. काही दिवसांआधीच केतकीला या प्रकरणात जामीन मिळाला. तब्बल 41 दिवस केतकीला या प्रकरणी जेलमध्ये जावं लागलं होते. जामीन मिळाल्यानंतर केतकीनं न्यूज १८ लोकमतला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. ( ketaki chitale exclusive) माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक होते, असा भयंकर आरोप केतकीनं केला आहे. या प्रकरणात राजकीय दबाव असल्याशिवाय असं होणार नाही,असा प्रश्न तिनं उपस्थित केलाय.  अटक केल्यानंतर केतकीबरोबर काय काय झालं हे देखील तिनं मुलाखतीत सांगितलं.

पोलिसांनी मला कोणतीही नोटीस न देता स्टेटमेंट नोंदवण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर अटक झाली तेव्हा अरेस्ट वॉरंट देखील देण्यात आला नाही.  हा फार मोठा गुन्हा आहे.  त्यानंतर ठाणे पोलीस मला घेऊन जात असताना राष्ट्रावादी काँग्रेसच्या बायका तिथे जमल्या होत्या. त्या क्षणी मला जोरात कानाखाली, डोक्यात मारण्यात आलं. मला धक्का देण्यात आला. मी साडी नेसली होती. माझ्या पायात पाय घालून पाडण्यात आलं. माझा पदर पडला माझी साडी खेचली गेली. माझा विनयभंग करण्यात आला. त्याचप्रमाणे माझ्यावर काळा रंग, अंडी फेकण्यात आली. पोलिसांनाही मारण्यात आलं. हा सगळा प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला.

हेही वाचा – वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

केतकी पुढे म्हणाली, पोलिसांविरोधात माझी काहीही तक्रार नाही. मला त्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांनी मला मारल किंवा टॉर्चर केलं नाही. त्यामुळे पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नाही. पण ज्यापद्धतीने त्यांनी मला अटक केली हे अनधिकृत असल्याचं केतकीनं म्हटलं आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात इतकी गर्दी कशी झाली हे त्यांनी  का पाहिलं नाही, अशी तक्रार केतकीने केली आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत निवडणूकीला उभ्या राहणाऱ्या अदिती नलावडे  या नेत्याही होत्या, असंही केतकी म्हणाली. माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रावादी काँग्रेसचे लोक होते. त्यांनी स्वत: आम्ही राष्ट्रावादी काँग्रेसचे आहोत असं FIRमध्ये  म्हटलं आहे. त्यामुळे मी स्वत:च्या मनाने काहीही म्हणत नाहीत. त्यांनी स्वत: साक्ष दिली तेव्हा त्यांनी असं सांगितलं आहे.  पोलिसांच्या नजरेसमोर नाही तर पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. पण याची साधी नोंदही घेण्यात आली नाही.  ज्यांना अटक करायला हवी होती ते मात्र बाहेर फिरत आहेत.

हेही वाचा – विवेक अग्निहोत्रीचा नवा कारनामा, एकीकडे मुखमंत्र्यांना शुभेच्छा तर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला सुनावले बोल!

शरद पवार यांना कळलं की आपल्याच पक्षातील लोक असं करत आहेत तेव्हा ते मध्ये का नाही पडले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, जे कोणी बाईवर हल्ला करतील त्यांचे आम्ही हात तोडू, मग तुमच्या पक्षातील लोक असं काही करतात तेव्हा त्यांनी मध्ये पडण्याची गरज होती. मात्र त्यांनी असं काहीही केलंलं नाही. उलट माझं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

केतकी विरोधात वेगवेगळ्या 22 पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रांरीविषयी बोलताना ती म्हणाली, ज्यांनी माझ्या विरोधात तक्रारी नोंदवल्यात त्यांना प्रश्न करत केतकी म्हणाली,  कॉपी पेस्ट केलेल्या पोस्टवरुन तुम्हाला अटक करण्यात येते. अटॅक करणारे बाहेर फिरत आहेत आणि मी 41 दिवस शिक्षा भोगत होते.41 दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कायमचे काढून घेतले जातात.   फुटकळ पोस्टसाठी अटक केली जाते.   22 लोकांनी तक्रारी दाखल केल्या.  एकाच दिवशी 108 जिआर साइन केले जातात. कळंबोली पोलिसांनी 14 तारखेला मला अटक करुन ठाणे पोलिसांकडे माझा ताबा देण्यात आला तेव्हा त्यांनी पुन्हा १५ तारखेला नवीन FIR लिहून घेतला. यामागे नक्कीच राजकीय दबाव असणार , असं केतकीनं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Ketaki #Chitalमझयवर #हलल #करणर #रषटरवद #कगरसच #लक #हतकतक #चतळ

RELATED ARTICLES

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

Most Popular

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...