Saturday, May 21, 2022
Home करमणूक Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टरने प्रेक्षकांची वाढली...

Jug Jugg Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ चे मोशन पोस्टरने प्रेक्षकांची वाढली उत्सुकता


Jug Jugg Jeeyo : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये कियारा आणि वरुणसोबत अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील दिसत आहेत.  

सिने निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत करणने लिहिले आहे,’या कुटुंबाचा एक भाग व्हा. लवकरच सिनेमे प्रदर्शित होणार आहे. 24 जूनला भेटू…”. नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अनिल कपूरनेदेखील ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे, कुटुंबाला भेटणं ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. ‘जुग जुग जिओ’ हा सिनेमा 24 जूनला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तसेच अनिल कपूरने सिनेमातील सहकलाकारांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
‘जुग जुग जिओ’ या सिनेमाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तर धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मीती करण्यात आली. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत. पुढील महिन्यात 24 तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 ‘जुग जुग जियो’ या सिनेमाव्यतिरिक्त कियारा आणि वरुण त्यांच्या इतर सिनेमांमध्येदेखील व्यस्त आहेत. कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’ या हॉरर, विनोदी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 20 मे रोजी रिलीज होणार आहे. तर वरुण धवन अभिनेता जान्हवी कपूरसोबत ‘बेडियां’ आणि करण जोहरच्या ‘बवाल’ सिनेमात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 : हम नशे में तो नही… ‘भूल भुलैया 2’ सिनेमातील गाणं प्रदर्शित; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज

Jayeshbhai Jordaar : जयेशभाई ‘जोरदार’ झालेच नाहीत; रणवीर सिंहचा चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले, ‘बोरिंग…’

Friday Movies Release : यंदाचा वीकेंड सिनेप्रेक्षकांसाठी खास, शुक्रवारी प्रदर्शित झाले ‘हे’ सिनेमेअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Jug #Jugg #Jeeyo #जग #जग #जओ #च #मशन #पसटरन #परकषकच #वढल #उतसकत

RELATED ARTICLES

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Most Popular

हाय गर्मी ! , तुमच्या मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा

वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होत असतो. लहानमुलींचे प्रतिकार शक्ती कमी असल्याने जर वातावरणात जर काही बदल झालेच तर त्याचा थेट...

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा 21 मे 2022 : ABP Majha

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | सामना 69 | वानखेडे स्टेडियम, मुंबई - 21 May, 07:30...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

Todays Headline 21st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं...