Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट Jioकडून विद्यार्थांसाठी Good News, या नवीन फीचरमुळे अभ्यास करणं आणखी सोपं

Jioकडून विद्यार्थांसाठी Good News, या नवीन फीचरमुळे अभ्यास करणं आणखी सोपं


मुंबई : सर्वाधीक लोकं सध्या jio टेलिकॉम कंपनीची सेवा घेत आहेत. तसे पाहाता आता एअरटेल आणि Vi देखील आता या बाजारात जोरदार कमबॅक करत आहेत. अशा  jio तरी कसा मागे राहाणार. त्यामुळे आपल्या वापरकर्त्यांना एक वेगळा आणि चांगला अनुभव देण्यासाठी jio पुढे आला आहे. जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी आश्चर्यकारक फीचर आणले आहेत. Jio ने आपल्या वेब ब्राउझिंग अॅप Jio Pages मध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. ज्याला स्टडी मोड असे नाव देण्यात आले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे तो खास विद्यार्थ्यांसाठीच बनवण्यात आली आहे.

स्टडी मोडचा वापरकर्त्यांना खूप उपयोग होईल असा कंपनीचा विश्वास आहे. एवढेच नाही, तर कंपनी असेही मानते की, जास्तीत जास्त मुले आता घरूनच शिकत आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस हे एक आव्हान बनत आहे. यासाठी जिओ पेजवर स्टडी मोड जोडण्यात आला आहे.

Study Mode चे फायदे

जिओचे नवीन वैशिष्ट्य Study Mode वापरकर्त्यांसाठी त्याच्या क्लास किंवा इयत्येनुसार त्यांना कंटेन्ट उपलब्ध करते. यामध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या विषयानुसार व्हिडीओ चॅनेलच्या सूचना मिळतात. यासह, हे वापरकर्त्यांना चॅनेल त्यांच्या आवडत्या किंवा फेव्हरेट श्रेणीमध्ये जोडण्याचा पर्याय देखील देत आहे.

या व्यतिरिक्त, येथे Education websiteची लिंक देखील दिले जातात, जेणेकरून वापरकर्ते त्या वेबसाइट्सवर थेट पोहोचू शकतील आणि मुलांचा गुगलवर काहीही शोधण्यात वेळ वाया जाणार नाही.

Jio Pages Study Mode कसे मिळवायचे ते जाणून घ्या

JioPages वर Study Mode वापरण्यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम हे वेब ब्राउझर डाउनलोड करणे आवश्यक आहे.
-डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, ऍप उघडा.
-येथे तुम्हाला मोड निवडण्याचा पर्याय मिळेल
-आपण त्यात स्विच मोड पर्यायावर जाऊन Study Mode सक्रिय करू शकता.

जिओ Jio Set-Top Box सह Jio Pages हे पूर्व-स्थापित आहे. तर इतर अँड्रॉइड टीव्ही वापरकर्ते ते Google Play Store वरून डाउनलोड करू शकतात.

8 भाषांमध्ये उपलब्ध

Jio Pages हा प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी सुरक्षित आहे. याला 8 भारतीय भाषांचे सपोर्ट देण्यात आले आहे. वापरकर्त्यांना या वेब ब्राउझरमध्ये कोणत्याही वेबसाइटच्या लिंक्स सेव्ह करण्याची सुविधा मिळेल. यासह, वापरकर्ते ती लिंक अधिक वेगाने उघडण्यास सक्षम असतील.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Jioकडन #वदयरथसठ #Good #News #य #नवन #फचरमळ #अभयस #करण #आणख #सप

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Online Fraud: 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

मुंबई: आजच्या हायटेक काळात इंटरनेटच्या वारपरामुळे कामं सोप्पी झाली आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन व्यवहार (online transactions) आल्यानंतर हॅकर्स देखील सक्रिय झाले असून Online...

Reliance Jio चे ३ सर्वात स्वस्त प्लान, वर्षभराची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा

नवी दिल्लीः Reliance Jio लवकरच आपल्या ग्राहकांसाठी देशात 5G नेटवर्क रोलआउट करण्याची तयारी करीत आहे. जिओ ही देशातील अशी टेलिकॉम कंपनी आहे. जिने...

आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

संदीप कदम मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत...

स्मार्टफोन सारख्या फीचर्ससह लाँच झाली Maxima ची शानदार स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी पाहता आता अनेक कंपन्या कमी किंमतीत येणाऱ्या शानदार स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करत आहेत. यातच आता Maxima ने...