Friday, May 20, 2022
Home भारत Jalgaon News : अन् ऊर्जा मंत्री राहणार त्याच विश्राम गृहातील बत्ती गुल,...

Jalgaon News : अन् ऊर्जा मंत्री राहणार त्याच विश्राम गृहातील बत्ती गुल, कर्मचाऱ्यांची तारंबळ  


Jalgaon News Update : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोळशाच्या तुटवड्यामुळे लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता याचा फटका राज्याच्या उर्जा मंत्र्यांनाच बसला आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut  ) जळगावमध्ये ज्या विश्राम गृहावर मुक्कामाला थांबले त्याच विश्राम गृहाचा काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे समोर आले आहे. 

नितीन राऊत सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते भुसावळ येथील औष्णिक केंद्राच्या विश्राम गृहात थांबले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे गुरूवारी रात्री उशिरा प्रवास करून आल्यानंतर त्यांनी विश्राम गृहात प्रवेश केला. परंतु, विश्राम गृहात त्यांनी प्रवेश केल्यानंतर काही  वेळातच विश्राम गृहाचा वीज पुरवठा खंडित झाला. उर्जा मंत्र्यांच्याच समोर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे  औष्णिक केंद्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.  

ऊर्जा मंत्र्यांच्या विश्राम गृहातीलच वीज गेल्याने हा विषय चांगलाच चर्चेला आला आहे. ओव्हर लोडिंग झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वीज खंडित झाल्यानंतर  काहीवेळात विश्राम गृहातील अधिकाऱ्यांनी हा वीज पुरवठा सुरळीत केला. 

दरम्यान, राज्यात गेल्या 22 दिवसांपासून कोठेही लोडशेडिंग नाही आणि यापुढेही ते होणार नाही अशी माहिती कालच नितीन राऊत यांनी दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांनाच या प्रकाराचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. 

“सध्या लोडशेडिंगबाबत ज्या चर्चा आहेत त्या निवळ वावड्या उठविण्यात येत आहेत. काही ठिकाणी काही वेळेसाठी वीज पुरवठा खंडित झाला तर त्याला काही कारणे असतात. जास्त लोड आल्याने आणि डिपीवर उष्णता वाढल्यामुळे वीज बंद पडते, याचा अर्थ त्याला लोडशेडिंग सुरू आहे असं म्हणता येणार नाही, असं  नितीन राऊत यांनी या प्रकारानंतर म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या

22 दिवसांपासून लोडशेडिंग नाही आणि पुढेही होणार नाही ; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची माहिती  

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Jalgaon #News #अन #ऊरज #मतर #रहणर #तयच #वशरम #गहतल #बतत #गल #करमचऱयच #तरबळ

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...