Saturday, May 21, 2022
Home क्रीडा IPL Play Offs : RCB च्या विजयाने एका नाही तर दोन टीमचं...

IPL Play Offs : RCB च्या विजयाने एका नाही तर दोन टीमचं स्वप्न तुटणार, असं बदलणार


मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शुक्रवारी आरसीबी आणि पंजाब किंग्स (RCB vs Punjab Kings) यांच्यात महत्त्वाची लढत होणार आहे. दोन्ही टीमसाठी प्ले-ऑफच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पंजाबसाठी मात्र ही करो या मरो ची लढाई आहे, तर आरसीबीसाठी प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) प्रवेश करण्याची सोपी संधी आहे. या सामन्यात आरसीबीचा विजय झाला तर ते प्ले-ऑफमध्ये तर पोहोचतीलच पण सोबतच दोन टीमचं स्वप्नही तुटेल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत 59 मॅच झाल्या आहेत आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) वगळता एकही टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आधीच या रेसमधून बाहेर झाले आहेत. बाकीच्या 7 टीम अजूनही 3 जागांसाठी लढत आहेत.
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 18 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. लखनऊ सुपरजायंट्स (16) दुसऱ्या, राजस्थान रॉयल्स (14) तिसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (14) चौथ्या नंबरवर आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्स (12), सनराइजर्स हैदराबाद (10) आणि कोलकाता नाइटराइडर्स (10) आहेत. पंजाब किंग्स (10) आठव्या नंबरवर आहे. चेन्नई सुपर किंग्स (8) आणि मुंबई इंडियन्स (6) शेवटच्या 2 क्रमांकांवर आहेत.
आरसीबीने आज पंजाबविरुद्ध विजय मिळवला तर त्यांच्या खात्यात 16 पॉईंट्स होतील. सध्या फक्त गुजरात आणि लखनऊ यांचेच 16 किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंट्स आहेत. आरसीबीचा आज विजय झाला तर पंजाबचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगेल.
आरसीबीचा विजय पंजाबसोबतच केकेआरचं जहाजही बुडवू शकतं. केकेआरच्या खात्यात 12 मॅचमध्ये 10 पॉईंट्स आहेत. केकेआरने उरलेल्या 4 मॅच जिंकल्या तरी त्यांच्या खात्यात जास्तीत जास्त 14 पॉईंट्स होतील.
चौथ्या टीममध्ये राजस्थान रॉयल्ससाठी गणित सोपं आहे. राजस्थानच्या खात्यात 12 मॅचमध्ये 14 पॉईंट्स आहेत, एक विजय त्यांना 16 पॉईंट्सवर नेईल. या परिस्थितीमध्ये प्ले-ऑफमध्ये खेळणाऱ्या चारही टीमचे कमीत कमी 16 पॉईंट्स होतील. दिल्लीलाही 16 पॉईंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. तर हैदराबादला 16 पॉईंट्सपर्यंत जाण्यासाठी तिन्ही मॅचमध्ये विजय गरजेचा आहे. गुजरात, लखनऊ, बँगलोरशिवाय राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद 16 पॉईंट्सच्या रेसमध्ये आहेत, त्यामुळे प्ले-ऑफचं समिकरण आणखी रोमांचक झालं आहे.

Published by:Shreyas

First published:

Tags: Ipl 2022, Punjab kings, RCBअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #Play #Offs #RCB #चय #वजयन #एक #नह #तर #दन #टमच #सवपन #तटणर #अस #बदलणर

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

मुंबई, 21 मे : कडक उन्हाळा सुरू असल्याने त्वचेसह केसांशी संबंधित समस्याही सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे...

फक्त दररोज पायांच्या तळव्याला करा मालिश; ‘हे’ त्रास नक्कीच दूर होतील!

आरोग्यशी संबंधित अनेक समस्या पायाच्या तळव्यांची मालिश केल्यानं बर्‍या होतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

MNS Teaser : पु्यातील सभेचा नवा टीजर, राज ठाकरे भात्यातील कोणता बाण बाहेर काढणार? ABP Majha

<p>पु्यातील सभेचा नवा टीजर, राज ठाकरे भात्यातील कोणता बाण बाहेर काढणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...