Thursday, July 7, 2022
Home क्रीडा IPL 2022 Eliminator RCB vs LSG: लखनऊ-बँगलोरसाठी 'करो या मरो', राहुलने टॉस...

IPL 2022 Eliminator RCB vs LSG: लखनऊ-बँगलोरसाठी ‘करो या मरो’, राहुलने टॉस जिंकला


कोलकाता, 25 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG vs RCB) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul)टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यामध्ये पाऊस असल्यामुळे टॉसला उशीर झाला. या सामन्यात लखनऊने टीममध्ये दोन बदल केले आहेत. कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डर यांच्याऐवजी कृणाल पांड्या आणि दुष्मंता चमिरा यांचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर आरसीबीने पुन्हा एकदा मोहम्मद सिराजला संधी दिली आहे.
दोन्ही टीमसाठी हा सामना करो या मरोचा आहे, कारण पराभूत होणाऱ्या टीमचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे, तर जिंकलेली टीम राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल. क्वालिफायर-2 च्या सामन्यात विजय मिळवलेली टीम रविवार 29 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध फायनल खेळणार आहे.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
लखनऊची टीम
क्विंटन डिकॉक, केएल राहुल, एव्हिन लुईस, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, मनन व्होरा, मार्कस स्टॉयनिस, मोहसिन खान, आवेश खान, दुष्मंता चमिरा, रवी बिष्णोई
आरसीबीची टीम
फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जॉश हेजलवूड, मोहम्मद सिराज
पावसामुळे आजचा सामना रद्द करावा लागला, तर लखनऊ सुपर जाएंट्सची टीम क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळेल. आयपीएलच्या नियमानुसार प्ले-ऑफचा सामना रद्द करावा लागला तर पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर असलेली टीम पुढे जाते. लीग स्टेजनंतर लखनऊची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि आरसीबी चौथ्या क्रमांकावर होती. लखनऊने 14 पैकी 9 मॅच जिंकल्या होत्या, तर आरसीबीला 14 पैकी 8 मॅच जिंकता आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #Eliminator #RCB #LSG #लखनऊबगलरसठ #कर #य #मर #रहलन #टस #जकल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Optical Illusion : काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये तुम्हाला नेमकं काय दिसतंय? 99.99 टक्के लोकं चुकलेत!

मुंबई : हे तुमच्या डोळ्यांना जितकं सोपे दिसतंय तितकं गुंतागुंतीचं कोडं आहे. जिथे सरळ रेषा तुम्हाला तुमच्या भ्रमात अडकवतील, की त्यातून बाहेर पडणे...

संविधान विरोधी वक्तव्य केलं आणि मंत्रिपद गमावलं

"मी राजीनामा दिला आहे आणि तो माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कधीही संविधानाची बदनामी केली नाही", अशी प्रतिक्रिया या मंत्र्यांने दिली आहे.  अस्वीकरण: ही...

… अशी करा खमंग आणि कुरकुरीत चकली, चव लक्षातच राहणार! Recipe

सणासुदीच्या दिवशी आपण चकली खातोच, पण पावसाळा आला की, गरम-गरम चहासोबत कुरकुरीत चकली खायला मिळणं, एक पर्वणीच असते. साऊथ इंडियामध्ये 'मुरुक्कू', गुजरातमध्ये 'चक्री'...

Hair Fall : प्रचंड केसगळतीमुळे आलीये टक्कल पडण्याची वेळ? प्रसिद्ध होमियोपॅथी डॉक्टरनी सांगितल्या 10 गोष्टी, झटक्यात बंद होईल हेअरफॉल..!

केसगळती (hair fall) ही अशी समस्या आहे जी पूर्वी फार कमी प्रमाणात होती पण आता मात्र 100 पैकी 60 ते 70 लोकं केसगळतीने...

अंडाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी पुरूषांनी लाइफस्टाइलमध्ये करावेत ६ महत्वाचे बदल

अंडाशयातील कॅन्सर म्हणजे टेस्टिक्युलर कॅन्सर पुरूषांशी संबंधीत एक गंभीर आजार आहे. हा आजार १५ ते ३५ वर्षातील वयोगटात पाहायला मिळतो. टेस्टिक्युलर कॅन्सरला वृषण...