Thursday, July 7, 2022
Home क्रीडा IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!


मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव केला आहे, याचसोबत आरसीबीचं प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याचं स्वप्न अजूनही कायम आहे. गुजरातने दिलेलं 169 रनचं आव्हान आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 115 रनची पार्टनरशीप झाली.
आरसीबीकडून विराट कोहलीने 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली, तर डुप्लेसिस 38 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. गुजरातकडून राशिद खानने दोन्ही विकेट घेतल्या.
या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 168 रन केले. हार्दिकने 47 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली. तर मिलरने 34 आणि ऋद्धीमान साहाने 31 रन केले. राशिद खान 6 बॉलमध्ये 19 रनवर नाबाद राहिला. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला 2, मॅक्सवेल आणि हसरंगा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
आरसीबीचं भवितव्य मुंबईच्या हातात
गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे, पण त्यांना आता मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, पण जर या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर मात्र आरसीबीचं प्ले-ऑफ खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळेल.

Published by:Shreyas

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Mumbai Indians, RCBअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #वरटन #गजरतल #धतल #तर #मबईच #ठरवणर #RCB #च #भवतवय

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Food For Healthy Lungs : निरोगी फुफ्फुसासाठी आहारात या 5 पदार्थांचा समावेश कराच, कधीच आरोग्याची कोणतीच दुखणी डोकं वर करणार नाहीत

Healthy Diet For Lungs : नॅशनल हार्ट, ब्लड आणि लंग इन्स्टिट्यूट ट्रस्टेड सोर्सच्या मते, क्रॉनिक लोअर रेस्पीरेटरी डिसीज - क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज...

Coronavirus : कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरला? अमेरिकेतील तज्ज्ञांचा खळबळजनक दावा

Coronavirus origin : कोरोना महामारीला अडीच वर्षांचा कालावधी उलटलाय. पण अद्याप याच्या उगमस्थानाबद्दल काही समजलेलं नाही. सुरुवातील वटवाघळामार्फत...

पीटी उषा, इलयाराजा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर निवड

Rajya Sabha: राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली आहेत. ही चारही...

‘मोदी सरकार’मधल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, दिल्लीतही ‘शिंदें’चं वजन वाढलं!

नवी दिल्ली, 6 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, या दोघांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ...

एकनाथ शिंदे यांची सावरकरांना मानवंदना, हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं : शरद पोंक्षे

Sharad Ponkshe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या मुंबईतील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. भर पावसात एकनाथ...

Recharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान

नवी दिल्ली : Vi yearly prepaid plan: खासगी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या तुलनेत मागे पडली...