Friday, May 20, 2022
Home क्रीडा IPL 2022 : मुंबईत बेयरस्टोचं वादळ, 10 बॉलमध्येच ठोकले 50 रन

IPL 2022 : मुंबईत बेयरस्टोचं वादळ, 10 बॉलमध्येच ठोकले 50 रन


मुंबई, 13 मे : जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांच्या आक्रमणामुळे पंजाबने आरसीबीविरुद्धच्या (Punjab Kings vs RCB) सामन्यात 20 ओव्हरमध्ये 209/9 एवढा स्कोअर केला. बेयरस्टोने 227.59 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 29 बॉलमध्ये 66 रनची वादळी खेळी केली, यात 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तर लिव्हिंगस्टोनने 42 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 70 रन केले.
ओपनिंगला आलेल्या बेयरस्टोच्या वादळी खेळीमुळे पंजाबने पहिल्या 6 ओव्हरमध्येच 83 रन केले होते. बेयरस्टोने त्याच्या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 4 फोर मारले, म्हणजेच त्याने 11 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पहिल्या ओव्हरपासूनच बेयरस्टोने त्याचा इरादा स्पष्ट केला. पहिल्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलला त्याने सिक्स मारली, यानंतर त्याने जॉश हेजलवूडच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 2 फोर मारत 22 रन कुटले. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने मोहम्मद सिराजला सिक्स मारली, याच ओव्हरला शिखर धवननेही फोर मारली, त्यामुळे 3.5 ओव्हरमध्येच पंजाबच्या 50 रन पूर्ण झाल्या.
आरसीबीकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर वानिंदु हसरंगाला 2 विकेट घेण्यात यश आलं. ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाज अहमद यांना 1-1 विकेट मिळाली.
आरसीबीने पाचवी ओव्हर ग्लेन मॅक्सवेलला दिली, तेव्हा शिखर धवनने पहिल्याच बॉलला सिक्स मारला, पण शेवटच्या बॉलला तो बोल्ड झाला. मोहम्मद सिराज टाकत असलेल्या सहाव्या ओव्हरमध्ये बेयरस्टोने एक फोर आणि 3 सिक्स लगावले, ज्यामुळे बेयरस्टोचं अर्धशतक फक्त 21 बॉलमध्येच पूर्ण झालं.
पंजाब किंग्सने या सामन्याआधी 11 सामन्यांमध्ये फक्त 5 मॅच जिंकल्या तर 6 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पंजाब किंग्सला त्यांच्या उरलेल्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

Published by:Shreyas

First published:

Tags: Ipl 2022, Punjab kings, RCBअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #मबईत #बयरसटच #वदळ #बलमधयच #ठकल #रन

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

IPL: अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम...

थायलंड खुलीबॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; आज यामागुचीचे आव्हान | Thailand Open Badminton Tournament Indus semifinals Yamaguchi challenge today ysh 95

पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी...