Friday, May 20, 2022
Home क्रीडा IPL 2022 : पराभवानंतरही दिसली धोनीची जादू, एका कृतीनं जिंकलं सर्वांचं मन!

IPL 2022 : पराभवानंतरही दिसली धोनीची जादू, एका कृतीनं जिंकलं सर्वांचं मन!


मुंबई, 13 मे : मुंबई इंडियन्स (MI) विरूद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचं (CSK) या आयपीएल सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या बॅटर्सनी निराशा केली. त्यांची संपूर्ण टीम फक्त 97 रनवर ऑल आऊट झाली. 98 रनचं आव्हान मुंबईनं 5 विकेट्स आणि 31 बॉल राखत पूर्ण केलं. सीएसकेचा या सिझनमधील हा आठवा पराभव होता.
धोनीनं जिंकलं मन
चेन्नई सुपर किंग्सची पडझड होत असातानाही कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) एक बाजू लावून धरत संघर्ष केला. धोनीनं 33 बॉलमध्ये नाबाद 36 रन केले. धोनीच्या या खेळीमुळेच चेन्नईला त्यांचा आयपीएल इतिहासातील सर्वात कमी स्कोअर पार करता आला. मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध शेवटपर्यंत लढणाऱ्या धोनीनं मॅचनंतर त्यांचे खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफचं मन जिंकलं.
धोनीनं चेन्नई सुपर किंग्सची जर्सी त्याच्या स्वाक्षरीसह मुंबई इंडियन्सचे तरूण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना दिली. त्यानं मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्डलाही धोनीनं एक जर्सी भेट दिली. धोनीच्या या कृतीनं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूसह सोशल मीडियावरही अनेकांचं मन जिंकलं आहे.

तरूण खेळाडूंचं कौतुक
महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या पराभवानंतरही टीममधील तरूण फास्ट बॉलर्सचं कौतुक केलं. मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनी ‘पॉवर प्ले’ मध्ये 4 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सला अडचणीत आणले होते.  ‘कोणत्याही पिचवर 130 पेक्षा कमी रन वाचवणे हे अवघड असते. मी बॉलर्सना परिणामाचा विचार न करता सर्वोत्तम खेळ करण्याचा सल्ला दिला होता. दोन्ही तरूण फास्ट बॉलर्सनी चांगला खेळ केला. या प्रकारच्या खेळातूनच त्यांचा स्वत:वरील विश्वास वाढेल.
IPL 2022 : ‘करो वा मरो’ लढतीपूर्वी KKR संकटात, दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर
आमच्याकडे यापूर्वी फास्ट बॉलर्सची बेंच स्ट्रेंथ कधीही नव्हती. तसंच फास्ट बॉलर्स परिपक्व होण्यास वेळ लागतो. तुम्ही नशिबवान असाल तरच सहा महिन्यामध्ये सर्व फॉर्मेट खेळेल असा बॉलर मिळतो. ते आता धाडसी बॉलिंग करत आहेत जे या प्रकारात आवश्यक आहे. आमच्याकडे दोन चांगले फास्ट बॉलर असणे ही सकारात्मक बाब आहे. त्याचबरोबर आमच्याकडे आणखी काही बॉलर आहेत. त्यांना तयार होण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे.’ असे धोनीनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #परभवनतरह #दसल #धनच #जद #एक #कतन #जकल #सरवच #मन

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...