मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पंजाब किंग्सने आरसीबीचा (Punjab Kings vs RCB) 54 रननी पराभव करत प्ले-ऑफचं (IPL Play Off) आपलं आव्हान अजूनही कायम ठेवलं आहे. दुसरीकडे एवढा मोठा पराभव झाल्यामुळे आरसीबीचं टेन्शन मात्र वाढलं आहे, कारण 54 रनच्या या पराभवामुळे त्यांच्या नेट रनरेट खूपच खराब झाला आहे. पंजाबने दिलेल्या 210 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 155/9 एवढाच स्कोअर करता आला.
आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 रन केले, तर रजत पाटीदारने 26 आणि विराट कोहलीने 20 रनची खेळी केली. पंजाबकडून कागिसो रबाडाला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर ऋषी धवन आणि राहुल चहरने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंग यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या मॅचमध्ये आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर जॉनी बेयरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी पंजाबच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. बेयरस्टोने 29 बॉलमध्ये 227.59 च्या स्ट्राईक रेटने 66 रन केले, यामध्ये 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तर लियाम लिव्हिंगस्टोनने 42 बॉलमध्ये 70 रन केले. लिव्हिंगस्टोनने 5 फोर आणि 4 सिक्स लगावले. आरसीबीकडून हर्षल पटेलला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, याशिवाय हसरंगाला 2 आणि मॅक्सवेल तसंच शाहबाज अहमदला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
पंजाबविरुद्धच्या या मोठ्या पराभवामुळे आरसीबीचा नेट रन रेट आता -0.323 एवढा झाला आहे. आरसीबीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आता आरसीबीला अखेरची मॅच मोठ्या फरकाने जिंकावी लागणार आहे, सोबतच त्यांना इतर टीमच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे, त्यामुळे आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचणं आता इतर टीमवर अवलंबून आहे.
दुसरीकडे पंजाब किंग्सने 12 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात आता 12 पॉईंट्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Punjab kings, RCB
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#IPL #पजब #पलऑफचय #रसमधय #कयम #मठय #परभवन #RCB #च #टनशन #वढल