Thursday, May 26, 2022
Home क्रीडा IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला निर्णायक टप्प्यात धक्का, मॅच विनर टीममधून आऊट

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला निर्णायक टप्प्यात धक्का, मॅच विनर टीममधून आऊट


मुंबई, 13 मे : दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे 12 मॅचनंतर 12 पॉईंट्स असून ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. आयपीएल स्पर्धेतील निर्णायक टप्प्यात दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मॅच विनर ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) उर्वरित 2 सामने खेळणार नाही.
पृथ्वी शॉला टायफाईड झाला आहे. त्यामुळे तो दिल्लीच्या गेल्या तीन मॅचमध्ये खेळलेला नाही. तो शेवटच्या दोन सामन्यातही खेळणार नसल्याची माहिती टीमचा असिस्टंट कोच शेन वॉटसन यानं दिली आहे. ‘त्याच्या तपासात काय आढळलं आहे हे मला माहिती नाही. पण त्याला गेल्या 2 आठवड्यापासून ताप होता. तो न खेळल्यानं आम्हाला फटका बसणार आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो, पण दुर्दैवानं शेवटच्या 2 मॅचसाठी तो फिट होणार नाही,’ असे वॉटसनने ‘द ग्रेड क्रिकेटर’ शी बोलताना सांगितले. दिल्लीची पुढील लढत 16 मे रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध तर शेवटची लढत 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध होणार आहे.
पंतही भावुक
पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतही (Rishabh Pant) भावुक झाला आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध विजय मिळवल्यानंतर त्यानं ही भावना बोलून दाखवली.  ‘आम्हाला त्याची मोठी कमतरता जाणवत आहे. पण, या गोष्टी नियंत्रणात नाहीत. त्याला टायफाईड की असंच काही तरी झालं आहे, असं डॉक्टरनं मला सांगितलं. तो लवकर परत येईल अशी आशा आहे. पण, तो कधी येणार हे माहिती नाही,’ असं पंत म्हणाला होता.
IPL 2022 : मुंबईच्या 19 वर्षांच्या खेळाडूची कमाल, पंतचा 5 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला
पृथ्वी शॉने या सिझनमधील 9 सामन्यांमध्ये 159.88 च्या स्ट्राईक रेटनं 259 रन केले आहेत. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या जोडीनं दिल्लीला दमदार सुरूवात करून दिली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीनं मनदीप सिंह आणि केएस भरत यांचा प्रयोग केला. पण, हे दोन्ही प्रयोग फसले. भरत राजस्थान विरूद्ध शून्यावरच आऊट झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #दलल #कपटलसल #नरणयक #टपपयत #धकक #मच #वनर #टममधन #आऊट

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

नवऱ्याच्या मृतदेहासमोर नववधू ढसाढसा रडली; हत्येच्या उलगडा होताच सासरकडच्या लोकांची पायाखालची जमीनच सरकली

नवीन लग्न होतं दोघेही आनंदात होते. नातेवाईक, सण म्हणा अशा सर्वच ठिकाणी दोघेही हजेरी लावत होते.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

IPL 2022 : विराट कोहलीची बॅटींग पाहून बदलला गांगुलीचा चेहरा, पाहा VIDEO

मुंबई, 26 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RCB vs LSG) 14 रननं पराभव करत आयपीएल 2022 मधील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश...

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

मुंबई, 26 मे : पंजाब किंग्जला (Punjab Kings) या आयपीएल स्पर्धेची 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पंजाबच्या टीमनं काही चमकदार विजय मिळवत शेवटच्या...

ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

ED Raids On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या...

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपासचा निसटता विजय; जोकोव्हिच, झ्वेरेव्ह, सबालेंका, अझरेंकाचीही आगेकूच; रॅडूकानू पराभूत | French Open tennis tournament Tsitsipas runaway victory Past...

एपी, पॅरिस : गतउपविजेत्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निसटत्या विजयाची नोंद केली. तसेच गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसऱ्या...