Saturday, May 21, 2022
Home क्रीडा IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला....

IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला….


मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे.
 त्यात आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने उमरान मलिकचे कौतुक केले आहे. उमरान मलिकने कौतुक करताना या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं आहे.  

पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उमरान मलिकचे जोरदार कौतुक केले आहे. अकमल म्हणतो, जर उमरान पाकिस्तान क्रिकेटचा भाग असता तर त्याने 
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असते. 

तसेच पुढे अकमल म्हणाला, त्याची इकोनॉमी चांगली आहे, पण तो स्ट्राइक गोलंदाज आहे आणि त्याला विकेट मिळत आहेत. त्याचा स्पीड चार्ट प्रत्येक सामन्यानंतर येतो, जिथे त्याचा वेग 155 किमी/ताशी असतो आणि तो कमी होत नाही. 

पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता होती, पण आता त्यांच्याकडे नवदीप सैनी, सिराज, शमी आणि बुमराहसारखे वेगवान गोलंदाज असल्याचेही त्यांनी म्हटले. 

भारतीय क्रिकेटने मलिकला आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी देऊन बरीच परिपक्वता दाखवली.ब्रेट ली आणि शोएब अख्तरही महागडे ठरले, पण त्यांनी विकेट घेतल्या आणि अशा स्ट्राईक गोलंदाजांची गरज आहे, असेही अकमल म्हणाला.  

उमरान मलिकला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावापूर्वी 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. तसेच नेट बॉलर म्हणून 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग होता.
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात उमरान मलिक केवळ 3 सामने खेळू शकला होता.

उमरानची कामगिरी 

उमरान मलिक आयपीएलच्या चालू हंगामात कहर करत आहे. जम्मू-काश्मीरच्या या गोलंदाजाने आपल्या वेगानं अनुभवी फलंदाजांना हैराण केलं आहे. उमरानने आतापर्यंत IPL 2022 मध्ये 11 सामन्यांत 24.26 च्या सरासरीने पंधरा बळी घेतले आहेत. 
यादरम्यान 25 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #उमरन #मलकच #कतक #करतन #पकसतनचय #मज #करकटपटन #भरतल #डवचल #महणल

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद

Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची...

मान्सून पूर्व पावसाने झोडपले; ९ जणांचा मृत्यू, पिकांचे नुकसान, शाळा-कॉलेज बंद

बेंगळुरू: देशात अद्याप मान्सूनची सुरुवात झालेली नाही. अंदमानात पोहोचलेल्या मान्सूनने देशातील अन्य भागात लवकरच येत असल्याचा इशारा दिलाय. कोकणासह दक्षिण भारतातील काही राज्यात...

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...

Rajya Sabha election: राज्यसभेसाठी संजय राऊतांचा ‘चौकार’, 26 मे रोजी भरणार अर्ज

मुंबई, २० मे -राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे तर...