Thursday, May 26, 2022
Home क्रीडा IPL 2022 : उमरान मलिककडे स्पीड असेल पण... हे काय बोलला शमी?

IPL 2022 : उमरान मलिककडे स्पीड असेल पण… हे काय बोलला शमी?


मुंबई, 13 मे : मोहम्मद शमीने (Mohammad Shami) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार बॉलिंग केली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात शमी गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळत आहे. मोहम्मद शमी हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगाने प्रभावित झाला आहे, पण त्याला मेहनत करण्याची गरज असल्याचं मत शमीने मांडलं आहे. जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकने या आयपीएलमध्ये 157 किमी प्रती तासाच्या वेगाने सगळ्यात जलद बॉल टाकला. आयपीएल इतिहासातला हा दुसरा सगळ्यात जलद बॉल आहे. तसंच उमरान आयपीएलमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकणारा भारतीय बॉलरही ठरला आहे.
उमरान मलिकच्या या वेगामुळे अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत, तसंच त्याची ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये निवड व्हावी अशीही मागणी करत आहेत.
‘जलद असणं योग्य आहे, पण जर तुम्ही 140 किमी प्रती तासाच्या वेगाने दोन्ही स्विंग करत असाल तरीही बॅटरला त्रास देऊ शकता. उमरान मलिकला परिपक्व व्हायला आणखी थोडा वेळ लागेल, त्याच्याकडे वेग आहे, पण जास्त खेळल्यानंतर तो गतीसोबतच वेगवेगळ्या गोष्टींबाबतही शिकेल,’ असं शमी म्हणाला.
आयपीएलमुळे समोर आलेल्या युवा फास्ट बॉलरना बघून शमी प्रभावित झाला आहे. ‘या मोसमात अनेक युवा फास्ट बॉलर आत्मविश्वासाने बॉलिंग करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. फास्ट बॉलर म्हणून आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला प्रतिभेसोबतच मॅच प्रॅक्टिसही गरजेची आहे. युवा फास्ट बॉलरना आयपीएलमुळे मॅच प्रॅक्टिस मिळत आहे. ते सीनियर खेळाडूंबसोबत वेळ घालवत आहेत आणि त्यांच्या अनुभवातून शिकत आहेत,’ अशी प्रतिक्रिया शमीने दिली.
आयपीएल 2022 मधल्या स्वत:च्या कामगिरीवरही शमी खूश आहे. ‘जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी 100 टक्के द्यायचा प्रयत्न केला, यात मी यशस्वीही झालो. मागच्या 3-4 आयपीएलमध्ये मी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरपैकी एक आहे.’ असं वक्तव्य शमीने केलं.
टी-20 क्रिकेटमध्ये कायमच शमीवर प्रश्न उपस्थित केले जातात. त्याला विकेट घेण्यात यश येतं, पण यात तो जास्त रन देतो, असा आक्षेप त्याच्यावर घेतला जातो. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने 5 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आणि 8.84 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. टी-20 वर्ल्ड कपनंतर शमी टीम इंडियातून बाहेर आहे.

Published by:Shreyas

First published:

Tags: Ipl 2022अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #उमरन #मलककड #सपड #असल #पण #ह #कय #बलल #शम

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल...

फक्त चवीसाठी नव्हे, कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; हाडांसाठी गुणकारी

नवी दिल्ली, 26 मे : कढीपत्ता (Curry leaves) हा सामान्यतः दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. खाद्यपदार्थांना एक विशेष चव आणण्यासाठी त्याचा वापर...

IPL 2022 : विराट कोहलीची बॅटींग पाहून बदलला गांगुलीचा चेहरा, पाहा VIDEO

मुंबई, 26 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RCB vs LSG) 14 रननं पराभव करत आयपीएल 2022 मधील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश...

अगायाया खतरनाक! ‘या‘ शेतकऱ्यांने पिकवलेल्या आंब्याला चक्क 2 ते 3 लाख रुपये किलो

नवी दिल्ली, 25 मे : ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील (Odisha bargadh district) एका शेतकऱ्याने (farmer) जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्‍या आंब्याच्या प्रजातीचे झाड मोठे...

Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद

<p>Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Smartphone Tips: रिपेअरिंगसाठी स्मार्टफोन सर्व्हिस सेंटरमध्ये देण्याआधी करा ‘हे’ काम, अन्यथा होणार मोठे नुकसान

नवी दिल्ली: Smartphone Safety : आजच्या या स्मार्ट आणि हायटेक जगात स्मार्टफोन न वापरणारी क्वचितच असेल. स्मार्टफोन शिवाय रोजच्या आयुष्याची कल्पना करणे देखील...