Thursday, July 7, 2022
Home क्रीडा IPL 2022 : 'उडता मॅक्सी', डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO


मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off) रेसमध्ये कायम राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya)  टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर 38 रनवर गुजरातने ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. आरसीबीने लीग स्टेजच्या 13 सामन्यांमध्ये 7 विजय तर गुजरातने 13 मॅचमध्ये 10 विजय मिळवले आहेत. दोन्ही टीमसाठी लीग स्टेजची ही शेवटची मॅच आहे.
पहिले बॅटिंगला उतरलेल्या गुजरातची सुरूवात खराब झाली. ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) 4 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला. इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये जॉश हेजलवूडने गिलची विकेट घेतली, पण ही विकेट हेजलवूडची कमी आणि मॅक्सवेलची (Glenn Maxwell) जास्त होती. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या मॅक्सवेलने हवेत उडी मारून एका हातामध्ये गिलचा कॅच घेतला.
आरसीबीसाठी ही विकेट महत्त्वाची होती, कारण या मोसमात गिलने 400 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. मॅक्सवेलने अफलातून कॅच घेतल्यानंतर विराटने (Virat Kohli) त्याला मिठी मारली.या भन्नाट कॅचनंतर मॅक्सवेल एक विकेटही घेतली. मॅथ्यू वेडला त्याने एलबीडब्ल्यू केलं. 13 बॉलमध्ये 2 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने त्याने 16 रन केले. मॅक्सवेलने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 1 विकेट घेतली, यामध्ये एका मेडन ओव्हरचा समावेश होता.
आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या 2 टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स, सीएसके आणि केकेआर या तीन टीम प्ले-ऑफमधून बाहेर झाल्या आहेत. या सामन्यात आरसीबीचा विजय झाला तर पंजाब किंग्स आणि हैदराबादही या रेसमधून बाहेर जातील. मग आरसीबी, दिल्ली आणि राजस्थान यांच्यात उरलेल्या दोन स्थानांसाठी स्पर्धा असेल.

Published by:Shreyas

First published:

Tags: Glenn maxwell, Gujarat Titans, Ipl 2022, RCBअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #उडत #मकस #ड #ऑर #डय #समनयत #मकसवलन #घतल #सपर #कच #VIDEO

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा धक्का, एका चुकीने पाकिस्तानचा फायदा

मुंबई, 5 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 5th Test) दारूण पराभव झाला, याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट...

Birthmark: जन्मजात शरीरावरील खुणांचे असते विशेष महत्व; म्हणून लकी ठरतात ही माणसं

मुंबई, 06 जुलै : काही लोकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही खुणा दिसतात, ज्याला आपण जन्मखूणही म्हणतो. हे जन्मचिन्ह काहीही असू शकते. शरीरावर दिसणार्‍या काही...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

गव्हांकुराचे ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Wheat Grass Juice Benefits) मानले जाते. त्यात भरपूर पोषक तत्व असतात. जे अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देण्यासाठी उपयुक्त...

WhatsApp युजर्स सावधान! यूकेमध्ये नोकरी आणि फ्री व्हिसाचं आमिष दाखवून फसवणूक

नवी दिल्ली, 06 जुलै : हल्ली ऑनलाइन फ्रॉडचं (Online Fraud) प्रमाण खूप वाढलंय. सायबर गुन्हेगार मेसेज किंवा कॉलद्वारे लोकांची फसवणूक करून पैसे लांबवतात....

पन्नाशीच्या मुख्यमंत्र्यांचं दुसरं लग्न; कोण आहे त्यांची होणारी बायको?

चंदीगड, 06 जुलै : नुकताच पंजाबच्या मान सरकारचा कॅबिनेट विस्तार झाला. यानंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान आपल्या संसाराची घडीही पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करत आहे (CM...

Optical Illusion : काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये तुम्हाला नेमकं काय दिसतंय? 99.99 टक्के लोकं चुकलेत!

मुंबई : हे तुमच्या डोळ्यांना जितकं सोपे दिसतंय तितकं गुंतागुंतीचं कोडं आहे. जिथे सरळ रेषा तुम्हाला तुमच्या भ्रमात अडकवतील, की त्यातून बाहेर पडणे...