Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IPL 2021 : KKR च्या 'बादशहा'चं टेन्शन खल्लास, उर्वरित स्पर्धेत 'सेनापती' खेळणार

IPL 2021 : KKR च्या ‘बादशहा’चं टेन्शन खल्लास, उर्वरित स्पर्धेत ‘सेनापती’ खेळणार


मुंबई, 4 ऑगस्ट : बॉलिवूडचा बादशहा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मालक शाहरुख खानचं (Shah Rukh Khan) मोठं टेन्शन दूर झालं आहे. आयपीएलच्या 14 व्या सिझनचा उत्तरार्ध पुढील महिन्यात सुरु होत आहे.  यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी शाहरुख खानची डोकेदुखी वाढली होती.  आता इंग्लंडमधून आलेल्या बातमीनं त्याची डोकेदुखी कमी झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन इयन मॉर्गननं  (Eoin Morgan) उर्वरित स्पर्धा खेळण्याचं जाहीर केलं आहे. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पुढील महिन्यात मर्यादीत ओव्हर्सची मालिका होणार होती. दोन्ही बोर्डाच्या सहमतीनंतर ही मालिका आता पुढील वर्षी मार्च महिन्यात होणार आहे. बांगलादेश विरुद्धची मालिका लांबणीवर गेल्यानं आयपीएल स्पर्धेत खेळायचं की नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) खेळाडूंना दिले आहे. त्यानंतर मॉर्गननं आपण उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याची घोषणा केली आहे.
मागील आयपीएल स्पर्धा सुरु असताना मॉर्गनची केकेआरचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तो उर्वरित स्पर्धेत खेळला नसता तर कॅप्टन कुणाला करायचा हा प्रश्न शाहरुख खान आणि टीम मॅनेजमेंटपुढे होता. ही समस्या आता दूर झाली आहे. आयपीएलनंतर लगेच यूएईमध्येच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील अनुभवाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये उपयोग होईल अशी आशा मॉर्गननं व्यक्त केली आहे.
IND vs ENG : अश्विनला टीममधून वगळण्याचे जोरदार पडसाद, सोशल मीडियावर विराट टार्गेट
बांगलादेशचा दौरा रद्द झाल्यानं आता आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडची टीम केवळ पाकिस्तान विरुद्ध दोन टी20 सामने खेळणार आहे. 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी हे सामने होणार आहेत. हे सामने नियोजित वेळापत्रकानुसार होतील अशी आशा दोन्ही देशांच्या बोर्डाने व्यक्त केली आहे. मात्र इंग्लंडच्या ज्या खेळाडूंच्या आयपीएल टीम ‘प्ले ऑफ’ मध्ये जाणार आहेत ते खेळाडू पाकिस्तान विरुद्ध खेळणार का? हा प्रश्न कायम आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #KKR #चय #बदशहच #टनशन #खललस #उरवरत #सपरधत #सनपत #खळणर

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

अन्वय सावंत मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...