Saturday, May 21, 2022
Home क्रीडा IPL : विधात्या तू एवढा कठोर का झालास? आऊट झाल्यानंतर 'रन'सम्राटाचा हताश...

IPL : विधात्या तू एवढा कठोर का झालास? आऊट झाल्यानंतर ‘रन’सम्राटाचा हताश VIDEO


मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 चा (IPL 2022) जुना फॉर्म विसरून विराट कोहली (Virat Kohli) पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings vs RCB) सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात उतरला. पंजाबने आरसीबीला विजयासाठी 210 रनचं आव्हान दिलं होतं, त्यामुळे आरसीबीला आक्रमक सुरूवात करणं गरजेचं होतं. विराटनेही अगदी तशीच सुरूवात केली. दोन फोर आणि एका सिक्सच्या मदतीने विराटने 14 बॉलमध्ये 20 रन केले, तेव्हा पुन्हा एकदा जुना विराट बघायला मिळणार, अशी आशा फक्त आरसीबी आणि स्टेडियममधल्या प्रेक्षकांनाच नाही, तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसमोर निर्माण झाली, पण आशेवर पुढच्याच बॉलला पाणी पडलं.
रबाडाने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर विराट लेग साईडला पूल मारायला गेला, पण त्याच्या ग्लोव्हज आणि मांडीला लागून बॉल फाईन लेगला उभ्या असलेल्या राहुल चहरकडे गेला. अंपायरने सुरूवातीला विराटला आऊट दिलं नाही, यानंतर पंजाबने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये बॉल विराटच्या ग्लोव्हजचा अलगद घासून गेल्याचं दिसलं, त्यामुळे थर्ड अंपायरने विराटला आऊट दिलं.
आऊट झाल्यानंतर विराट पॅव्हेलियनमध्ये जाताना खूपच हताश दिसला. आकाशाकडे बघून विराट काहीतरी म्हणाला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या या मोसमात विराटची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्याने 13 मॅचच्या 13 इनिंगमध्ये 19.67 ची सरासरी आणि 113.46 च्या स्ट्राईक रेटने फक्त 236 रन केले आहेत. विराटच्या बॅटमधून या मोसमात फक्त एक अर्धशतक आलं आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या 54 रनच्या पराभवामुळे आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. एवढा मोठा पराभव झाल्यामुळे आरसीबीचा नेट रनरेट वजा झाला आहे, त्यामुळे आता त्यांना उरलेली एक मॅच मोठ्या फरकाने जिंकावी लागणार आहे, तसंच इतर टीमच्या कामगिरीवरही आरसीबीला अवलंबून राहावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #वधतय #त #एवढ #कठर #क #झलस #आऊट #झलयनतर #रनसमरटच #हतश #VIDEO

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

IPL 2022: मुंबईच्या शेवटच्या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का?

मुंबई, 21 मे : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील शेवटचा सामना आज (शनिवार) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे. दिल्लीचं...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...

उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

मुंबई, 21 मे : कडक उन्हाळा सुरू असल्याने त्वचेसह केसांशी संबंधित समस्याही सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे...

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...