Thursday, May 26, 2022
Home भारत IPL मधील सट्टेबाजाचे पाकिस्तान कनेक्शन,  CBI ने तिघांना केली अटक

IPL मधील सट्टेबाजाचे पाकिस्तान कनेक्शन,  CBI ने तिघांना केली अटक


IPL Betting : आयपीएलचा 15 वा हंगाम समाप्तीकडे झुकला आहे. आतापर्यंत 60 सामने झाले आहेत. स्पर्धेतील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. तर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आयपीएल 2022 उत्तरार्धाकडे झुकला असतानाच आयपीएलमधील सट्टाबाज आणि फिग्सिंग संदर्भात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. हे प्रकरण 2019 मधील आहे. याप्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहे. 

केंद्रीय तपास यंत्राणाने (Central Bureau of Investigation) शनिवारी मॅच फिग्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. 2019 मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या सट्टेबाजी प्रकरणी या तिघांना सीबाआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयला या तपासात पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे. तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतामध्ये काही मॅच फिग्सिंग रॅकेट सुरु आहे, याला पाकिस्तानमधून फूस मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे… या तिघांना पाकिस्तानमधून मदत घेऊन आयपीएलमध्ये फिग्सिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  

बेटिंगच्या माध्यामातून आयपीएलच्या सामन्याचा निकाल बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. यातून सर्वसामान्य भारतीय लोकांना गंडवण्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे बँकमध्ये खाती उघडली जातात, जी बेटिंगसाठी वापरली जातात, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. दिलीप कुमार असे अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेले आरोपी आयपीएलमध्ये 2013 पासून सट्टेबाजी करत असल्याचे सीबीआयने म्हटलेय. तसेच पाकिस्तानमधील वाकास मलिक याच्या फोन क्रमांकही सीबीआयला तपासात मिळाला आहे. सीबीआय अधिक तपास करत आहे… 

केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय संपूर्ण भारतामध्ये सध्या आयपीएल सट्टेबाजी नेटवर्कचा तपास करत आहे. अनेक शहरांमध्ये तपास सुरु आहे. शनिवारी सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. या तिघांचा संबंध आयपीएल फिक्सिंग आणि सट्टेबाजीसोबत असल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये पाकिस्तानमधून सट्टेबाजी केल्याचेही समोर आले. सीबीआयने तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये काही अज्ञात म्हणून असाही उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पाकिस्तानमधून सट्टेबाजीद्वारे आयपीएल सामन्याचा निकाल ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटलेय. 

आणखी वाचा :

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#IPL #मधल #सटटबजच #पकसतन #कनकशन #CBI #न #तघन #कल #अटक

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार येत्या भागात?

मुंबई, 26 मे:  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu zhal)  मालिकेला सध्या भावनिक वळण आलं आहे. लाडक्या दीपूचा अपघात झाल्यानं सगळ्यांना मोठा...

Anil Parab : अनिल देशमुख प्रकरणी मुख्य तपासक Tassine Sultan यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी सुरु

<p>अनिल देशमुख प्रकरणी मुख्य तपासक Tasin Sultan यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी सुरु.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली दीड वर्षांची चिमुकली; पण साधं खरचटलंही नाही

डेहराडून, 25 मे : काहींना चालता-बोलता, हसता-खेळता मृत्यू गाठतो तर काहींसोबत जीवघेणी दुर्घटना होऊनही त्यांना काहीच होत नाही. अशीच एक चमत्कारिक घटना सध्या चर्चेत...

LSG vs RCB: विराटला बाद केल्यानंतर आवेश खाननं केलेली ‘ती’ कृती चर्चेत; Viral Video वरुन दोन गट, पाहा नेमकं घडलं काय | IPL 2022...

आयपीएलच्या २०२२ च्या पर्वामधील पहिल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्सवर १४ धावांनी विजय मिळवला. रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२)...

IPL 2022 : रजतचं शतक राहुलवर भारी, लखनऊला धक्का, RCB फायनलच्या आणखी जवळ

कोलकाता, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सना (RCB vs LSG) पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे...