अंपायरच्या चुकीने बुडवलं केकेआरचं जहाज?
आयपीएल 2022 च्या संपूर्ण मोसमात खराब अंपायरिंगवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. केकेआर आणि लखनऊच्या सामन्यातही याची पुनरावृत्ती झाली. फक्त 2 रननी केकेआरचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं.
रिंकू सिंगने वादळी खेळी करत केकेआरच्या हाताबाहेर वाटत असलेला विजय जवळ आणला, पण मार्कस स्टॉयनिसच्या (Marcus Stoinis) बॉलिंगवर रिंकू (Rinku Singh) आऊट झाला. स्टॉयनिसने टाकलेल्या याच बॉलवरून आता टीका होऊ लागली आहे. रिप्लेमध्ये स्टॉयनिसने टाकलेला बॉल नो बॉल असल्याचा आरोप चाहते करत आहेत.
It’s clearly no ball #Rinku 😟 #KKRvLSG pic.twitter.com/CJnLFZVgpH
— Harsha Guntupalli (@HarshaJSP1995) May 18, 2022
Ghanta Big Player…
See this is clear no ball on which Rinku caught by Lewis.#noball #rinkusingh #KKRvsLSG #IPL2022 https://t.co/Regs25Nyko pic.twitter.com/kEoPas6Vwc
— 🇮🇳Dharme$h (@100_Dharmesh) May 18, 2022
शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 21 रनची गरज होती, तेव्हा रिंकूने पहिल्या चार बॉलवर फोर-सिक्सच्या मदतीने 18 रन ठोकले. शेवटच्या 2 बॉलवर 3 रनची गरज असताना रिंकूने स्टॉयनिसच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारला, पण एव्हिन लुईसने अफलातून कॅच पकडला आणि केकेआरच्या हातातून मॅच निसटली.
लखनऊ या विजयासोबतच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली आहे. त्याआधी गुजरात प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली होती. आता उरलेल्या दोन स्थानांसाठीची रेस रोमांचक झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#IPL #अपयरचय #एक #चकमळ #KKR #पलऑफमधन #बहर #रकचय #वकटमळ #नव #वद