Thursday, May 26, 2022
Home क्रीडा IPLवर वर्चस्व असणारी 'ही' पाच कुटुंब तूम्हाला माहितीयत का ? जाणून घ्या...

IPLवर वर्चस्व असणारी ‘ही’ पाच कुटुंब तूम्हाला माहितीयत का ? जाणून घ्या…


मुंबई : आयपीएल (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अवघ्या काही दिवसातंच 15 व्या हंगामाचा विजेता ठरणार आहे.तत्पुर्वी आयपीएलवर वर्चस्व असणाऱ्या 5 कुटुंबातील जोडप्यांची माहिती देणार आहोत. नेमके हे 5 कुटुंब कोण आहेत, ते या बातमीत जाणून घेऊयात.  

 सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर 

या दोघांच्या जोडीबद्दल तर तुम्हाला माहितचं असेल. सचिन (Sachin Tendulkar)हा मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians)मार्गदर्शक आहे तर त्याचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar)  हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे.  या दोघा बाप-मुलाची जोडी मुंबईच्या ताफ्यात आहे.  
मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडली आहे, तर निव्वळ एक-दोन सामनेच उरले आहेत. त्यामुळे आता अर्जुनला या सामन्यात तरी संधी मिळणार का ? हे पहावे लागेल.  

 पंड्या ब्रदर्स 

हार्दिक पंड्या (Hardik Pandya)आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya) हे सख्खे भाऊ असून दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. गेल्या मोसमात हे दोघेही मुंबईकडून खेळायचे, मात्र आता हे वेगवेगळ्या संघाकडून खेळतात. 
हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार आहे, तर कुणाल लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow super giants)खेळाडू आहे. दोघेही सध्या चांगली कामगिरी करत आहेत. 

 अनमोलप्रीत सिंग आणि प्रभसिमरन सिंग 

पटियालाचे असलेले अनमोल (Anmolpreet singh)  आणि प्रभसिमरन (prabhsimran) चुलत भाऊ आहेत. अनमोलचे वडील सतविंदर सिंग हे हँडबॉल खेळाडू असून त्यांनी एकेकाळी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 
विशेष म्हणजे सतविंदर सिंगला क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नव्हता आणि त्याचा मुलगा आणि पुतण्याने क्रिकेटपटू व्हावे अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. मात्र दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट हेच क्षेत्र निवडले. अनमोलप्रीत हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे तर प्रभासिमरन हा पंजाब किंग्जचा खेळाडू आहे. 
या दोन्ही क्रिकेटपटूंनी या मोसमात एक-दोन सामनेचं खेळले आहेत. मात्र, त्यांना आपली छाप सोडता आली नाहीय. 

 मार्को जॅन्सन आणि डुआन जॅन्सेन 

दक्षिण आफ्रिकेचे  मार्को जॅन्सन (Marco Jansen)आणि डुआन जॅन्सेन (Duan jansen)हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मार्को हा सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू आहे तर दुआने हा मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर आहे. 
दक्षिण आफ्रिकेच्या मार्कोने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर त्याचा जुळा भाऊ देखील एक चांगला गोलंदाज आहे.  

 मायकेल हसी आणि डेव्हिड हसी 

मायकेल हसी (michael hussey) आणि डेव्हिड हसी (david hussey) हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मायकेल चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक आहे तर डेव्हिड कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक आहे. 
दोघे हसी ब्रदर्स आपापल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.  





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPLवर #वरचसव #असणर #ह #पच #कटब #तमहल #महतयत #क #जणन #घय

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा...

मेंढीवर आहे महिलेच्या हत्येचा आरोप; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली 26 मे : जगाच्या अनेक भागांमध्ये अशा गोष्टी घडतात की तुम्ही त्याबद्दल विचारही केलेला नसते. सध्या अशीच एक घटना दक्षिण सुदान...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

मुलांच्या आहारात फळं-भाज्या असायला हव्या; त्यांच्या एकाग्रतेमध्ये असा होतो फायदा

नवी दिल्ली, 26 मे : आजच्या जीवनशैलीत फास्ट-फूडच्या वाढत्या वापरामुळे आहारातील फळे आणि भाज्यांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या नैसर्गिक...

LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर

मुंबई, 26 मे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू सहकारी अशी ख्याती असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil...