Saturday, July 2, 2022
Home भारत IPCC Report : मुंबईसह भारतातील 'ही' महत्त्वाची शहरे तीन फूट पाण्याखाली...

IPCC Report : मुंबईसह भारतातील ‘ही’ महत्त्वाची शहरे तीन फूट पाण्याखाली जाणार, आयपीसीसीचा इशारा


IPCC Report 2021 :   पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज 2021 – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढल्याने  येणाऱ्या काळात समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबई, चेन्नई, कोची, विशाखपट्टणम या शहरांचा ,मावेश आहे. 

भारतातील 12 शहरात शतकाच्या शेवटी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्याता आहे. यापूर्वी असे  बदल 100 वर्षात होत होते. मात्र आता 2050 नंतर हे बदल दर सहा ते नऊ वर्षांनी होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे येत्या काळात समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील शहरांना धोका असणार आहे.  गेल्या तीन हजार वर्षात झाली नसेल इतक्या वेगाने 1900 सालापासून जागतिक स्तरावर समु्द्राच्या पातळीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर समुद्राच्या जल पातळीचे 2100 सालापर्यंत 2 मीटरपर्यंत आणि 2150 सालापर्यंत 5 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील शंभर ते हजारो वर्षांच समुद्राच्या जलपातळीत वाढ होत राहणार आहे.

‘ही’ 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता 

 1. कांडला: 1.87 feet 
 2. ओखा: 1.96 feet
 3. भावनगर : 2.70 feet
 4. मुंबई: 1.90 feet
 5. मोरमोगाओ : 2.06 feet
 6. मँगलोर: 1.87 feet
 7. कोचिन: 2.32 feet
 8. पारदीप : 1.93 feet
 9. खिडीपूर : 0.49 feet
 10. विशाखापट्टणम: 1.77 feet
 11. चेन्नई : 1.87 feet
 12. तुतीकोरीन: 1.9 feet

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील वातावरण बदलाच्या संदर्भाचे परीक्षण करणारा हा अहवाल आहे. मानवी कृत्यांमुळे पृथ्वीच्या वातावरणीय व्यवस्थेत कशाप्रकारे बदल होतात, हे सूचीत करणारा हा आहवाल आहे.   हवामान बदलाच्या या घोंघावणाऱ्या संकटाने खूप काही बदलणार आहे.  हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांचा धोका येत्या काळात अधिक वाढणार आहे. महाराष्ट्राला देखील तापमानवाढीचा फटका बसला असून पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#IPCC #Report #मबईसह #भरततल #ह #महततवच #शहर #तन #फट #पणयखल #जणर #आयपससच #इशर

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Dhule : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून ‘या’ दोन नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी?

Maharashtra Political Crisis : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला...

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

मशरूमच्या या फोटोंमध्ये लपलाय एक उंदीर, तुमच्या नजरेला सापडतोय का?

नुकतंच व्हायरल झालेल्या Optical Illusion फोटो असंच काही आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

शिंदे गटाला लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या टीममध्ये कुणाला संधी?

मुंबई, 02 जुलै : महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (cm...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Bill Gates Resume : बिल गेट्स यांनी शेअर केला तब्बल 48 वर्ष जुना रेझ्युमे! पोस्ट लिहित म्हणाले.

Bill Gates Resume : कोणतीही नोकरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठीची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला रेझ्युमे. रेझ्युमे हे आपल्या...