हायलाइट्स:
- न्यूज चॅनल ‘अल जजिरा’च्या रिपोर्टमध्ये दावा
- पुराव्यासाठी सेटेलाईट फोटो, आर्थिक डाटाचा आधार
- भारतीय नौसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
कतारची प्रमुख अरब मीडिया संघटना असलेल्या अल जजिरा या न्यूज चॅनलनं सॅटेलाईट फोटो, फायनान्शिल डाटा आणि इतर काही पुराव्यांचा हवाला देत हा दावा केला आहे.
अगालेगा बेटावर निर्माणाधीन असलेल्या एका हवाईपट्टीचा वापर निश्चित स्वरुपात भारतीय नौसेनेद्वारे समुद्रगस्ती मिशनसाठी केला जाऊ शकतो, असं विश्लेषण सैन्यतळांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी काही पुराव्यांच्या आधारे केल्याचं ‘अल जजिरा’नं म्हटलंय.
अगालेगा हे जवळपास १२ किलोमीटर लांब आणि १.५ किलोमीटर रुंद बेट आहे. हे मॉरिशिअसच्या मुख्य बेटापासून जवळपास १,१०० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या भागात जवळपास ३०० नागरिक राहतात.
हे भारतासाठी एक गुप्त तळ आहे. दक्षिण – पश्चिम हिंद महासागर आणि मोझाम्बिक चॅनलमध्ये नियंत्रण आणि देखरेखीसाठी हवाई तसंच नौसेनेची उपस्थिती हे तळ दर्शवतं, असा दावा ‘अल जजिरा’नं केलाय.
ऑर्ब्जव्हर रिसर्च फाऊंडेशन थिंक टँक, नवी दिल्लीचे असोसिएट फेलो अभिषेक मिश्रा यांच्या हवाल्यानं ‘अल जजिरा’नं हा दावा केलाय.
उल्लेखनीय म्हणजे, ‘अल जजिरा’च्या या रिपोर्टसंबंदी भारतीय नौसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Indian #Navy #मरशअस #बटवर #भरतय #नसन #तळ #उभरणर #रपरटमधय #दव