Saturday, August 13, 2022
Home भारत India Post recruitment 2021 | 10 आणि 12वी पास तरुणांसाठी पोस्टात विविध...

India Post recruitment 2021 | 10 आणि 12वी पास तरुणांसाठी पोस्टात विविध पदासाठी भरती


मुंबई : नोकरीच्या  शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट विभागात (India Post Recruitment 2021) 10वी आणि 12 वी पास तरुणांसाठी  विविध पदांसाठी पदभरती केली जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्ट विभागाने पंजाब पोस्टल सर्कलसाठी ही भरती आहे. यानुसार पोस्टल असिस्टेंट, सॉर्टिंग असिस्टेंट, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती आहे. (Recruitment in Indian Post Department for 10th and 12th pass candidates without exam know the details)

अर्ज कसा करायचा?  

इच्छुक उमेदवार या भरतीसंदर्भात अधिक माहिती https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx  या लिंकवर जाऊन जाणून घेऊ शकतात. या पदासांठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 18 ऑगस्ट आहे. विशेष म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

इच्छुक तरुण तरुणी https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_09072021_Punjab.pdf या लिंकद्वारे अधिक सविस्तर जाणून घेऊ शकतात. एकूण 57 रिक्त जागांसाठी ही पदभरती असणार आहे. तसेच शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा, असं आवाहन संबंधित विभागाद्वारे करण्यात आलंय. अनेकदा काही इच्छूक उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज करतात. त्यामुळे वेबसाईटवर जोर येतो. परिणामी अर्ज भरता येत नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागू नये, म्हणून हे आवाहन करण्यात आलंय.  

पदनिहाय किती जागा? 

पोस्टल असिस्टेंट – 45 पद
सॉर्टिंग असिस्टेंट – 9 पद
मल्टी टास्किंग स्टाफ – 3 जागा

अटी काय आहेत? 

पोस्टल असिस्टेंट या सॉर्टिंग असिस्टेंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12वी पास असावा. उमेदवाराने सर्टिफाईड बेसिक कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा. तसेच मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणारा तरुण हा किमान 10 वी पास किंवा समकक्ष असावा. तसेच उमेदवाराला संबंधित राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषेचं ज्ञान असावं.  

कोणत्या पदासाठी वयोमर्यादा किती? 

पोस्टल असिस्टेंट आणि सॉर्टिंग असिस्टेंट – 18 ते 27 वर्ष

मल्टी टास्किंग असिस्टेंट – 18 ते 25 वर्ष

पगार किती?

पोस्टल असिस्टेंट आणि सॉर्टिंग असिस्टेंट | 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये. 

मल्टी टास्किंग असिस्टेंट | 18  हजार  ते  56 हजार 900 रुपये.  

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#India #Post #recruitment #आण #12व #पस #तरणसठ #पसटत #ववध #पदसठ #भरत

RELATED ARTICLES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

आंबट ढेकर, छातीत जळजळ, अपचन मुळापासून दूर करणारी टिप्स

Acid reflux home remedy :लठ्ठपणा, धुम्रपान, जास्त खाणे, कॅफिनचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही औषधे ही स्थिती वाढवू शकतात. या समस्येवर...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...