Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs SL : राहुल द्रविडने 'शब्द' पाळला, सीरिजपूर्वी म्हणाला होता...

IND vs SL : राहुल द्रविडने ‘शब्द’ पाळला, सीरिजपूर्वी म्हणाला होता…


टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला (Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपावण्यात आली.

टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला (Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपावण्यात आली.

कोलंबो, 28 जुलै : टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला (Rahul Dravid) श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपावण्यात आली. या दौऱ्याच्या आधी राहुल द्रविडने सगळ्या खेळाडूंना 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचमध्ये संधी देण्यात येईल, असं राहुल द्रविड म्हणाला होता. राहुल द्रविडने दौऱ्याआधी केलेलं हे वक्तव्य दुसऱ्या टी-20 वेळी खरं ठरलं. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या 20 खेळाडूंपैकी 18 खेळाडूंना पहिल्या टी-20 पर्यंत संधी मिळाली होती. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) हे दोघंच संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. दुसऱ्या टी-20 मधून या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यासह एकूण 9 खेळाडू या सीरिजमधून बाहेर झाले, त्यानंतर टीम इंडियाला निवड करण्यासाठी फक्त 11 खेळाडूच होते, त्यामुळे या सगळ्या खेळाडूंना घेऊन खेळण्याशिवाय टीमला गत्यंतर नव्हतं.
सूर्यकुमार यादव, इशान किशन, पृथ्वी शॉ, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दीपक चहर, युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम हे 8 खेळाडू कृणाल पांड्याच्या संपर्कात आले. सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे, या मॅचमध्येही हेच 11 खेळाडू मैदानात उतरतील.
काय म्हणाला राहुल द्रविड?
दुसरी टी-20 मॅच सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. ‘दुर्दैवाने कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आता उरलेली सीरिज खेळता येणार नाही. आम्हाला निवड करायला फक्त 11 च माणसं होती, त्यामुळे त्यांचीच निवड करावी लागली. हे सगळे 11 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी लायक आहेत, म्हणूनच त्यांची टीम इंडियामध्ये निवड झाली. यांना मैदानात बघण्यासाठी मी उत्सूक आहे,’ असं राहुल द्रविड म्हणाला.
फक्त 11 खेळाडूच उपलब्ध असल्यामुळे टीम संतुलित नसल्याचं राहुल द्रविडने मान्य केलं. या सामन्यात टीम इंडिया फक्त 5 बॅट्समन घेऊन खेळत आहे.
अशी आहे भारतीय टीम
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती

Published by:Shreyas

First published:

India Vs Sri lankarahul dravid



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #रहल #दरवडन #शबद #पळल #सरजपरव #महणल #हत

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...