Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs SL: राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला? गुपित उलगडलं

IND vs SL: राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला? गुपित उलगडलं


मुंबई, 29 जुलै: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये (India vs Sri Lanka) टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवानंतर तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही टीममध्ये बुधवारी झालेला सामना चांगलाच रंगतदार झाला. त्या सामन्याच्या दरम्यान भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) एका चिठ्ठीतून मैदानात खास संदेश पाठवला होता.
द्रविडंनं श्रीलंकेच्या इनिंगमधील 18 वी ओव्हर संपल्यानंतर टीम इंडियाचा राखीव खेळाडू संदीप वॉरियरसोबत मैदानात चिठ्ठी पाठवली होती. त्यावेळी श्रीलंकेचा स्कोअर 6 आऊट 113 होता. पावसामुळे मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी मैदानात कव्हर देखील घालण्यात आले होते. मात्र पाऊस लवकर थांबला आणि ओव्हर्स कमी न होता खेळ सुरू झाला.
काय होते कारण?
राहुल द्रविड या छोट्या ब्रेकच्या दरम्यान ड्रेसिंग रुममधून बाहेर आला. त्यानंतर त्याने संदीप वॉरियरच्या हातामध्ये चिठ्ठी दिली होती. पावसामुळे मॅच थांबली तर डकवर्थ लुईस मेथडनुसार 18 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोअर किती असावा याची माहिती या चिठ्ठीमध्ये देण्यात आली होती.
IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी विराट कोहली अडचणीत, ‘त्या’ पोस्टचा बसणार फटका!
18 व्या ओव्हरमध्ये आलेल्या पावसाच्या अडथळ्यानंतर लगेच खेळ सुरू झाला. धनंजय डिसिल्वाच्या (Dhananjaya De Silva) नाबाद खेळीमुळे श्रीलंकनं भारतानं दिलेलं 133 रनंचं आव्हान पार केलं. डिसिल्वाने 34 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले, तर चामिका करुणारत्नेने (Chamika Karunaratne) 6 बॉलमध्ये नाबाद 12 रनची महत्त्वाची खेळी केली. याशिवाय मिनोद भानुका 31 बॉलमध्ये 36 रन करून आऊट झाला.
या विजयाबरोबरच श्रीलंकेच्या टीमने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची अखेरची मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #रहल #दरवडन #मचचय #दरमयन #कय #सदश #पठवल #गपत #उलगडल

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...