Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs SL : राहुल चहरने बाऊंड्री लाईनवर पकडला भन्नाट कॅच, पाहा...

IND vs SL : राहुल चहरने बाऊंड्री लाईनवर पकडला भन्नाट कॅच, पाहा जबरदस्त VIDEO


कोलंबो, 28 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचे (India vs Sri Lanka) बॅट्समन अपयशी ठरले. 20 ओव्हरमध्ये भारताला 132 रनच करता आले. एवढ्या कमी आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग करायची गरज होती, त्यामुळे टीमनेही अगदी तशीच कामगिरी केली. बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या राहुल चहरने (Rahul Chahar) आविष्का फर्नांडोचा (Avishka Fernando) भन्नाट कॅच पकडला. राहुल चहरने पकडलेला हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvnehswar Kumar) मॅचची तिसरी ओव्हर टाकत होता. तेव्हा ओव्हरच्या चौथ्या बॉलला आविष्का फर्नांडोने डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्क्वेअर लेगला उभा असलेला राहुल चहर धावत कॅच पकडण्यासाठी फाईन लेगच्या दिशेने गेला. कॅच पकडताना तो बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात होता, पण तेव्हाच त्याने चपळता दाखवत हातातला बॉल हवेत उडवला. यानंतर तो बाऊंड्री लाईनवरून पुन्हा मैदानात आला आणि कॅच पूर्ण केला. 13 बॉलमध्ये 11 रन करून फर्नांडो आऊट झाला.

12 रनवर पहिली विकेट गेल्यानंतर श्रीलंकेने 39 रनवर दुसरी विकेट गमावली. सदीरा समरविक्रमाला 8 रनवर वरूण चक्रवर्तीने बोल्ड केलं.

कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडू या सीरिजमधून बाहेर झाले आहेत, त्यामुळे टीम इंडियाला उपलब्ध असलेल्या 11 खेळाडूंना मैदानात उतरावं लागलं. या सामन्यात टीम इंडियामध्ये 5 बॅट्समन आणि 6 बॉलर्स आहेत.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), नितीश राणा (Nitish Rana) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) हे आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #रहल #चहरन #बऊडर #लईनवर #पकडल #भननट #कच #पह #जबरदसत #VIDEO

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...