Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs SL : टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पुन्हा निराशा, श्रीलंकेच्या बॉलरला...

IND vs SL : टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पुन्हा निराशा, श्रीलंकेच्या बॉलरला दिलं Birthday Gift


कोलंबो, 29 जुलै : टीम इंडियाच्या (Team India) बेंच स्ट्रेंथला श्रीलंका दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी होती. वन-डे सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समननं टी20 मालिकेत निराशा केली. सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी ठरले.
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. मोठा स्कोअर करत श्रीलंकेवर दबाव टाकण्याची टीम इंडियाची योजना होती. मात्र धवनसह टॉप ऑर्डरला त्या योजनेनुसार खेळ करता आला नाही. शिखर धवनला भोपळा फोडण्यातही अपयश आले. धवन आऊट झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना चांगली संधी होती.
या जोडीला मोठी पार्टनरशिप करण्यात अपयश आले. देवदत्त पडिक्कल 9 रन काढून आऊट झाला. त्यानंतर संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. सॅमसनला शून्यावर हसरंगानं आऊट केलं. त्यानंतर हसरंगानं त्याच ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडला 14 रनवर आऊट करत टीम इंडियाला चौथा धक्का दिला. हसरंगाचा (Hasaranga) आजच (गुरुवारी) 24 वा वाढदिवस आहे. हसरंगाला एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स देत टीम इंडियानं बर्थ-डे गिफ्ट दिले आहे.
टीम इंडियाचा आणखी एक नवोदीत खेळाडू नितीश राणा (Nitish Rana) देखील या सामन्यात अपयशी ठरला. राणानं फक्त 6 रन काढले. राणा आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची 9 व्या ओव्हर्समध्येच 5 आऊट 36 अशी अवस्था झाली.   या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला होता. त्यानंतर बुधवारी झालेला दुसरा टी 20 सामना जिंकत श्रीलंकेनं बरोबरी साधली आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी हा निर्णायक सामना जिंकणे आवश्यक आहे.
IND vs SL: मोठ्या संघर्षानंतर मिळाली टीम इंडियात संधी, संदीप वॉरियर झाला भावुक! VIDEO
या मॅचमध्ये टीम इंडियानं एक बदल केला आहे. दुसऱ्या सामन्यात नवदीप सैनी (Navdeep Saini) देखील दुखापतग्रस्त झाल्यानं संदीप वॉरियरचा (Sandeep Warrier) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #टम #इडयचय #टप #ऑरडरच #पनह #नरश #शरलकचय #बलरल #दल #Birthday #Gift

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...