Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs SL : आणखी 2 जण करणार पदार्पण, वाचा कशी असेल...

IND vs SL : आणखी 2 जण करणार पदार्पण, वाचा कशी असेल टीम इंडियाची Playing 11


कोलंबो, 29 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) हा मालिका जिंकण्यासाठी गुरुवारी होणारा तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. भारतीय टीमला दुसऱ्या सामन्यात काही चुकांचा फटका बसला. टी20 मालिका जिंकण्यासाठी या चुका टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात  बदल करणार का? हा प्रश्न आहे.
श्रीलंकेविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात फास्ट बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) फिल्डिंग करताना जखमी झाला. सैनी जखमी झाल्यानं तो या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा नवोदीत फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakruya) बुधवारच्या सामन्यात महागडा ठरला होता. सकारियानं 3.4 ओव्हर्समध्ये 34 रन दिले. त्यामुळे सकारियाच्या जागी देखील टीम मॅनेजमेंट दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे.
भारत 4 स्पिनर्ससह उतरणार?
कोलंबोच्या पिचनं स्पिन बॉलर्सना चांगली मदत केली आहे. भारतानं दुसऱ्या सामन्यात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि राहुल चहर या तीन स्पिनर्सना खेळवलं होतं. त्या तिघांनीही चांगली कामगिरी केली. आता तिसऱ्या सामन्यात सैनीच्या जागी अतिरिक्त स्पिनर खेळवण्याचा निर्णय टीम इंडिया घेऊ शकते. तसं झालं तर तामिळनाडूचा स्पिनर आर. साई किशोर (R. Sai Kishore) तिसऱ्या सामन्यात पदार्पण करेल. साई किशोरची नेट बॉलर म्हणून श्रीलंका दौऱ्यात निवड झाली होती. टीम इंडियाला कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानं त्याचा बुधवारी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
चेतन सकारियाच्या जागी अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) संधी मिळण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या अर्शदीपनं आयपीएल स्पर्धेत डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचा हा अनुभव लक्षात घेता त्यालाही शेवटच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
IND vs SL: राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला? गुपित उलगडलं
टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि आर. साई किशोरअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #आणख #जण #करणर #पदरपण #वच #कश #असल #टम #इडयच #Playing

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...