केपटाऊन, 13 जानेवारी : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचं (India vs South Africa 3rd Test) पारडं जड आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 101/2 एवढा झाला आहे, त्यांना विजयासाठी आणखी 111 रनची गरज आहे. दिवसाच्या शेवटच्या बॉलला बुमराहने धोकादायक डीन एल्गारची (Dean Elgar) 30 रनवर विकेट घेतली, यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्याआधी मोहम्मद शमीने एडन मार्करमला 16 रनवर आऊट केलं होतं.
तिसऱ्या दिवशी अखेरच्या तासात डीन एल्गारच्या डीआरएसवरून मोठा वाद निर्माण झाला. अश्विनच्या बॉलिंगवर एल्गारला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं, यानंतर एल्गारने डीआरएस घ्यायचा निर्णय घेतला. डीआरएसमध्ये एल्गार नॉट आऊट असल्याचं दिसलं आणि टीम इंडियाच नाही तर अंपायरनाही धक्का बसला. डीआरएसच्या या वादानंतर भारतीय बॉलर्सनी मोठ्या प्रमाणावर रन द्यायला सुरूवात केली, अखेर दिवसाच्या शेवटी भारताला एल्गारला आऊट करण्यात यश आलं.
‘देशच आमच्याविरोधात खेळतोय’, विराट स्टम्प माईकसमोर येऊन बोलला, वादग्रस्त VIDEO VIRAL
त्याआधी ऋषभ पंतच्या नाबाद शतकामुळे भारताचा 198 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 रनचं आव्हान मिळालं. ऋषभ पंतच्या नाबाद 100 रन वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. पंतशिवाय विराट कोहलीने 29 रन केले.
भारताला अजून दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या दौऱ्यातल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन करत सीरिज बरोबरीत आणली. आता तिसऱ्या टेस्टमध्येही दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड वाटत आहे, त्यामुळे यंदाही भारताचं टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#IND #3rd #Test #दवसचय #शवटचय #बलल #वकट #पण #भरतच #सवपन #अधरच