Monday, July 4, 2022
Home क्रीडा IND vs ENG Four Indian players will join Leicestershire Cricket team for...

IND vs ENG Four Indian players will join Leicestershire Cricket team for Practice Match vkk 95गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. तिथे १ जुलै ते ५ जुलै याकाळात दोन्ही संघादरम्यान शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अप्टॉनस्टील काउंटी मैदानावर एक चार दिवसीय सराव सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. आजपासून (२३ जून) सुरू होणाऱ्या या सामन्यादरम्यान भारतीय कसोटी संघात फूट पडलेली दिसणार आहे.

भारतीय संघातील चार तारांकित खेळाडू लीसेस्टरशायरकडून खेळणार आहेत. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा लीसेस्टरशायरच्या संघाकडून सराव सामन्यात भाग घेणार आहेत. लीसेस्टरशायरच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाल्यामुळे संघातील सर्व सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंट पाहता दोन्ही संघातून १३-१३ खेळाडू खेळतील.

याशिवाय, भारतीय निवड समितीने नवदीप सैनी, कमलेश नागरकोटी आणि सिमरजीत सिंग यांना इंग्लंड दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सैनी आणि नगरकोटी संघासोबत आहेत तर सिमरजीत सिंग लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.

भारतीय संघ गेल्या वर्षी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, करोनाच्या संकटामुळे पाचवा सामना न खेळताच भारतीय संघ मायदेशी परतला होता. हाच एक सामना खेळून मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ आता इंग्लंडला गेला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करताना दिसेल.

हेही वाचा – मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपये

दरम्यान, मालिका पुढे ढकलण्यात आल्यापासून दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. इंग्लंडनेही जो रूटच्या जागी अष्टपैलू बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे कर्णधारपद दिले आहे. याशिवाय दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षकदेखील बदलले आहेत. भारतीय संघ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तर यजमानांचा संघ ब्रँडन मॅकक्युलमच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसणार आहे.

असे असतील दोन्ही संघ

लीसेस्टरशायर संघ: सॅम्युअल इव्हान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम्युअल बॅट्स (यष्टीरक्षक), नॅथन बॉली, विली डेव्हिस, जो इव्हिसन, लुईस किम्बर, एविडाइन स्कँद, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #Indian #players #join #Leicestershire #Cricket #team #Practice #Match #vkk

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

12 व्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती महिला; मात्र बसला झटका!

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न (Marriage) ही एक महत्वाची बाब आहे. प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी उत्सुक असतो. लग्न झाल्यानंतर दोन्ही जण नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतात....

लवकर वजन कमी करण्यासाठी रोज या पदार्थाचे सेवन करा, लगेच फरक दिसेल

मुंबई :  सध्या बरेच लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, ज्यामुळे ते वजन न वाढण्यासाठी किंवा असलेले वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करतात. परंतु...

Rahul Narvekar : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, बहुमताचा आकडा पार

Maharashtra Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत...

मद्य कि मध? बाटली बघून गोंधळली अभिनेत्री; धम्माल VIDEO एकदा पाहाच

मुंबई, 02 जुलै: कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) सुंदर मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharali) मालिकेतील लतिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. लतिका म्हणजेच अभिनेत्री...

हेमा मालिनी यांना मुंबईत घराबाहेर पडण्याची वाटतेय भीती, सांगितला धक्कादायक किस्सा

मुंबई: ड्रीमगर्ल अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) या सध्या खासदार म्हणूनही काम करत आहेत. मथुराच्या खासदार असल्याने त्यांचा बहुतांशी...

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...