Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs ENG : विराट-रोहितमध्ये पुन्हा पॅच-अप! मैदानातला ब्रोमान्सचा VIDEO

IND vs ENG : विराट-रोहितमध्ये पुन्हा पॅच-अप! मैदानातला ब्रोमान्सचा VIDEO


लंडन, 17 ऑगस्ट : भारतीय टीमने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England Lords Test) लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या 89 रनच्या पार्टनरशीपमुळे टीम इंडियाने हा सामना फिरवला. या दोघांच्या नाबाद पार्टनरशीपनंतर भारताने डाव घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान दिलं, पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 120 रनवरच ऑल आऊट झाला. भारताच्या भेदक बॉलिंगपुढे इंग्लंडची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडच्या बॅटिंगदरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भावनिक क्षण अनुभवला. याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातल्या एका क्षणाने इंटरनेटचं लक्ष वेधून घेतलं. इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला भारताने आधीच आऊट केलं होतं, पण जो रूट भारताच्या विजयात अडसर ठरत होता. बुमराहने टाकलेला बॉल जो रूटच्या (Joe Root) बॅटच्या एजला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने कॅच पकडला. त्याआधी इशांत शर्माने (Ishant Sharma) जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) आऊट केलं होतं. कोहलीने घेतलेल्या डीआरएसचा परिणाम भारताच्या बाजूने आला, यानंतर विराटने रोहितला मिठी मारली. या दोघांचा मैदानातला ब्रोमान्स बघून चाहतेही भारावून गेले.

काही काळापूर्वी या दोन महान खेळाडूंमध्ये वाद असल्याच्या चर्चा जोरात झाल्या. 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर या चर्चांनी आणखी जोर धरला, पण या दोघांनी कधीच याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. लॉर्ड्स टेस्टमध्ये मात्र या दोघांनी एकमेकांना मिठी मारून टीकाकारांची बोलती बंद केली.


लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम मजबूत स्थितीमध्ये होती, पण शमी-बुमराहच्या पार्टनरशीपने इंग्लंडला बॅकफूटवर नेलं. विराट कोहलीने लंचनंतर डाव घोषित केला, यानंतर भारतीय बॉलर्सनी खेळपट्टीवर अक्षरश: आग ओकली. इंग्लंडचा 120 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे भारताने हा सामना 151 रनने जिंकला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #वरटरहतमधय #पनह #पचअप #मदनतल #बरमनसच #VIDEO

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...