Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs ENG : विराट कोहलीने इंग्लंडच्या जखमेवर चोळलं मीठ, सांगितला मॅचचा...

IND vs ENG : विराट कोहलीने इंग्लंडच्या जखमेवर चोळलं मीठ, सांगितला मॅचचा टर्निंग पॉईण्ट


लॉर्ड्स टेस्टवेळी भारत-इंग्लंडमध्ये तणाव

भारतीय टीमचा इंग्लंडविरुद्ध (India vs England) लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये रोमांचक विजय झाला. लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड टीमच्या जखमेवर मीठ चोळलं.

लंडन, 17 ऑगस्ट : भारतीय टीमचा इंग्लंडविरुद्ध (India vs England) लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये रोमांचक विजय झाला. मॅचच्या अखेरच्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान दिलं. इंग्लंडला ऑल आऊट करण्यासाठी भारताकडे 60 ओव्हर होत्या, पण टीमने 8 ओव्हर आधीच 120 रनवर इंग्लंडला ऑल आऊट केलं आणि मॅच 151 रनने जिंकली.
लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड टीमच्या जखमेवर मीठ चोळलं. मॅचदरम्यान वाढलेल्या तणावामुळे टीमला विजयासाठी प्रेरणा मिळाली. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नवव्या विकेटसाठी केलेल्या पार्टनरशीपमुळे विजयाचा पाया रचला गेला, असं विराट मॅचनंतर म्हणाला.
मोहम्मद शमीने 70 बॉलमध्ये नाबाद 56 रन आणि जसप्रीत बुमराहने 64 बॉलमध्ये नाबाद 34 रन केले. या दोघांमध्ये 89 रनची पार्टनरशीप झाली. भारताने 298/8 वर इनिंग घोषित केली, त्यामुळे इंग्लंडला विजयासाटी 272 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 120 रनवर ऑल आऊट झाला.
‘मला पूर्ण टीमवर अभिमान आहे. खेळपट्टीवर पहिले तीन दिवस बॉलरना मदत मिळाली नाही, पण आम्ही आमची रणनिती योग्य पद्धतीने लागू केली. बुमराह-शमीने ज्या पद्धतीने दबावात बॅटिंग केली, तिकडूनच आम्हाला मदत मिळाली. मैदानात झालेल्या तणावामुळेही आम्ही प्रेरित झालो,’ असं विराटने सांगितलं.
‘तळाच्या खेळाडूंना अशी पार्टनरशीप करण्याची संधी फार मिळत नाही. जेव्हा आम्ही यशस्वी ठरलो तेव्हा खालच्या बॅट्समननी चांगली कामगिरी केली. आम्ही 10 विकेट घेऊ शकतो, हे आम्हाला माहिती होतं. मैदानातल्या तणावामुळे शमी-बुमराह उत्साही होते, त्यामुळे त्यांना नवा बॉल देण्यात आला आणि आम्हाला लगचे विकेट मिळाल्या,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
मैदानात तणाव
खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये (Jos Butller) बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) आक्रमक झाला. लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने शिव्या दिल्या आणि जोरजोरात टाळ्याही वाजवल्या.
कसा सुरू झाला वाद?
तिसऱ्या दिवशी बुमराह आणि जेम्स अंडरसन (James Anderson) यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर या वादाला सुरुवात झाली. बुमराहने अंडरसनवर बाऊन्सरचा पाऊस पाडला. यातले काही बॉल अंडरसनच्या शरिरावरही लागले. अखेर मोहम्मद शमीने अंडरसनला बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर निराश झालेला अंडरसन भारतीय खेळाडूंना काहीतरी बोलला. यानंतर चौथ्या दिवशीही विराट आणि अंडरसन यांच्यात वाद झाले आणि पाचव्या दिवशीही हा पंगा सुरूच राहिला.

Published by:Shreyas

First published:

india vs englandvirat kohliअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #वरट #कहलन #इगलडचय #जखमवर #चळल #मठ #सगतल #मचच #टरनग #पईणट

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....