Saturday, July 2, 2022
Home क्रीडा IND vs ENG : विराट-अँडरसनच्या पहिल्या लढतीत अनुभवी क्रिकेटपटूची सरशी! पाहा VIDEO

IND vs ENG : विराट-अँडरसनच्या पहिल्या लढतीत अनुभवी क्रिकेटपटूची सरशी! पाहा VIDEO


नॉटिंघम, 6 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यातील पाच टेस्टच्या मालिकेत विराट कोहलीची सुरुवात निराशाजनक झाली आहे. विराट अगदी पहिल्या बॉलवर आऊट (Golden Duck) होईल, अशी कल्पना इंग्लंडच्या टीमनं केली नसेल. विराटकडून टीम इंडियाला मोठी अपेक्षा होती. मात्र त्यानं निराशा केली. विराटची ही विकेट अन्य कुणी नाही तर इंग्लंडचा सर्वात अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसननं (James Anderson) घेतली.  अँडरसनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर विराट फसला.
नॉटींघम टेस्टमध्ये भारतानं सुरुवात चांगली केली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल (Rohit Sharma- KL Rahul) या जोडीनं दुसऱ्या दिवशी सकाळी सावध सुरुवात केली. टीम इंडियाचा स्कोअर 1 आऊट 100 होता. त्यावेळी 41 वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या अँडरसननं टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. अँडरसननं त्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर चेतेश्वर पुजाराला आऊट केलं. त्यानंतर पुढच्याच बॉलवर विराटला ऑफ साईडच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर चकवलं. विराटनं तो बॉल बचावात्मक पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. बॉल विराटच्या बॅटच्या बाहेरच्या भागाला लागून विकेट किपर जोस बटलरच्या हातामध्ये विसावला.

पहिली चकमक जिंकली
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये विराट विरुद्ध अँडरसन यांच्यात होणाऱ्या लढाईकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. टेस्ट सीरिज सुरू व्हायच्या आधी विराटला अँडरसनचा सामना कसा करशील? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी विराटनं मी फक्त बॅटींग करेल असं उत्तर दिलं होतं.
Tokyo Olympics : बजरंगाची कमाल! शेवटच्या क्षणी फिरवली मॅच, सेमी फायनलमध्ये प्रवेश
विराटला 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसननं चांगलंच त्रस्त केले होते. त्या दौऱ्यात अँडरसननं विराटला फक्त 50 बॉलमध्ये 4 वेळा आऊट केले. त्यानंतर 2018 साली झालेल्या दौऱ्यात विराटनं अँडरसनच्या 270 बॉलचा सामना करत 114 रन काढले. तसंच तो एकदाही अँडरसनकडून आऊट झाला नाही. आता 2021 मध्ये या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये तिसरी लढत सुरू झाली आहे. या लढतीमधील पहिली चकमक अँडरसननं जिंकलीय. आता विराट पुढील इनिंगमध्ये याला काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #वरटअडरसनचय #पहलय #लढतत #अनभव #करकटपटच #सरश #पह #VIDEO

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात....

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये विश्वास टिकवूणं सर्वात महत्त्वाचं, या टिप्स ठरतील..

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) म्हणजे तुम्ही काय समजता? लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे फक्त एकमेकांना वेळ देणे किंवा एकत्र वेळ घालवणे नव्हे...

नीरजचा आणखी एक धमाका, फक्त १६ दिवसात मोडला स्वत:चा विक्रम आणि जिंकले पदक

स्टॉकहोम (स्वीडन): टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा(Neeraj Chopra )ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. स्टॉकहोम डायमंड लीग(Stockholm Diamond League)मध्ये नीरजने ८९.९४ मीटर...

महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा

Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin...

हे काय? पोटात बाळ नव्हे तर…; प्रेग्नंट महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

लंडन, 01 जुलै : मळमळणं, उलटी, चक्कर येणं, मासिक पाळी चुकणं अशी सुरुवातीचा लक्षणं दिसल्यानंतर प्रेग्नन्सीचं पुढील लक्षण म्हणजे पोटाचा वाढणारा आकार. जसजसा...