Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : मोहम्मद शमीनं केली मोठी चूक, ऋषभ पंतचा चेहरा...

IND vs ENG : मोहम्मद शमीनं केली मोठी चूक, ऋषभ पंतचा चेहरा पडला!


नॉटिंगहम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नॉटिंगहममध्ये (India vs England 1st Test) पहिली टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्या. त्यानंतर इंग्लंडला चौथा धक्काही लगेच बसला असता, पण मोहम्मद शमीनं (Mohammad Shami) केलेल्या चुकीचा त्यांना फायदा झाला.
इंग्लंडच्या इनिंगमधील 39 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. रविंद्र जडेजाच्या त्या ओव्हरमधील पाचवा बॉल जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow)  टोलावला आणि तो एक रनसाठी पळाला. शमीनं तो बॉल तात्काळ अडवला. ते पाहाताच इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं बेअरस्टोला परत पाठवले. बेअरस्टो तो पर्यंत अर्ध्या क्रिजच्या पुढे आला होता.
शमीनं त्यावेळी तात्काळ विकेट किपर ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) थ्रो केला असता तर बेअरस्टो रन आऊट झाला असता. पंतनं ओरडून तशी मागणी देखील केली होती. मात्र शमीनं त्याकडं बॉलिंग करत असलेल्या जडेजाकडं थ्रो केला. जडेजानं तो बॉल पुन्हा पंतकडे थ्रो केला. तोपर्यंत बेअरस्टोला क्रिजमध्ये परत येण्याची संधी मिळाली. शमीच्या चुकीमुळे बेअरस्टोला रन आऊट करण्याची सोपी संधी टीम इंडियानं गमावली. त्यामुळे ऋषभ पंतचा चेहरा पडला. बेअरस्टो त्यावेळी सात रनवर खेळत होता.
पंतमुळे मिळाली विकेट
त्यापूर्वी ऋषभ पंतनं DRS घेण्याचा जोरदार आग्रह केल्यामुळेच टीम इंडियाला झॅक क्राऊलीची विकेट मिळाली. मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर क्राऊलीच्या बॅटला लागून बॉल पंतकडे गेला. त्यावेळी पंतनं कॅच आऊटचं अपिल केलं. मैदानातील अंपायरनं ते फेटाळलं.  विराट कोहली देखील Review घेण्याच्या विचारात नव्हता. मात्र पंतनं कोहलीकडं जोरदार आग्रह केला.
IPL 2021 : KKR च्या ‘बादशहा’चं टेन्शन खल्लास, उर्वरित स्पर्धेत ‘सेनापती’ खेळणार
पंतच्या या आग्रहामुळेच कोहलीनं अखेर थर्ड अंपायरकडे दाद मागितली. त्यावेळी रिप्लेमध्ये क्राऊलीच्या बॅटसा बॉल लागल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट झालं. त्यामुळे भारताला दुसरी विकेट मिळाली. पंतचा पहिला निर्णय चुकला असला तरी त्यानंच दोन बॉलनंतर केलेल्या आग्रहामुळे भारताला हे यश मिळाले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #महममद #शमन #कल #मठ #चक #ऋषभ #पतच #चहर #पडल

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

‘हा’ शेअर पोहचला 270 रूपयांवरून 50,000 रूपयांवर

एका multibagger stock ने नुकतीच एक मोठी मजल मारली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

संजय मांजरेकरने पुन्हा एकदा Ravindra jadeja ला डिवचलं

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा  (Ravindra jadeja)  यांच्यातला वाद काही जुना नाही...

Mumbai: ‘खूप आमिषे दाखवली जातील पण कुणाचं ऐकू नका’ उद्धव ठाकरेंचा मुंबईतील माजी नगरसेवकांना कानमंत्र

<p><strong>Mumbai:</strong> मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील माजी नगरसेवकांशी संवाद साधला. येत्या काळात...

‘न्यूड फोटोशूट’प्रकरणी रणवीर सिंगला मुंबई पोलिसांकडून समन्स | actor ranveer singh summoned by mumbai police in case of nude photoshoot

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे एकच वादंग माजले. त्याच्या या फोटोंना पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. काहींनी रणवीरला पाठिंबा...