Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : पहिल्या टेस्ट आधी टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी...

IND vs ENG : पहिल्या टेस्ट आधी टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी एक खेळाडू बाहेर


लंडन, 2 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे, पण पहिल्या टेस्ट आधीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. सराव करत असताना मोहम्मद सिराजचा बाऊन्सर त्याच्या डोक्याला लागला. मयंक अग्रवाल बाहेर झाल्यामुळे आता टीम इंडियापुढे ओपनिंगला कोणाला खेळवायंच हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) हे तीन खेळाडू आधीच टेस्ट सीरिजमधून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्यानंतर शुभमन गिलऐवजी मयंक अग्रवाल ओपनिंगला खेळेल, असं सांगितलं जात होतं. आता मयंक अग्रवालही बाहेर झाल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. केएल राहुलने सराव सामन्यामध्ये शतक केलं होतं, त्यामुळे तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
सूर्या-पृथ्वी कधी पोहोचणार?
दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या कोरोनाच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत, त्यामुळे त्यांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या 24 तासांमध्ये हे दोघं इंग्लंडसाठी रवाना होतील, अशी माहिती आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही या दोघांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, यानंतरच ते टीममध्ये प्रवेश करू शकतील. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध होतील.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #पहलय #टसट #आध #टम #इडयल #मठ #धकक #आणख #एक #खळड #बहर

RELATED ARTICLES

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

Most Popular

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...