Monday, July 4, 2022
Home क्रीडा IND vs ENG : पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित! हे आहे...

IND vs ENG : पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित! हे आहे कारण


इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने (India vs England) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी भारताने इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केला.

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने (India vs England) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी भारताने इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केला.

नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने (India vs England) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी भारताने इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केला. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला (Mohammad Shami) 3, शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) 2 आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) 1 विकेट मिळाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण इंग्लंडची सुरुवात खराब झाली.
इंग्लंडचा स्कोअर 138/3 होता, पण त्यांची बॅटिंग गडगडली आणि 160 रनवर 9 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले, म्हणजेच 22 रनवर त्यांनी 6 विकेट गमावल्या. इंग्लंडची संपूर्ण टीम 65.4 ओव्हरमध्ये 183 रनवर ऑल आऊट झाली.
फास्ट बॉलर्सनी घेतल्या 10 विकेट
भारताच्या फास्ट बॉलर्सनी इंग्लंडच्या सगळ्या 10 विकेट घेतल्या. याआधी इंग्लंडमध्ये तीनवेळा भारताच्या फास्ट बॉलर्सनी अशी कामगिरी केली होती, तेव्हा इंडियाचा पराभव झाला नाही. एक मॅच जिंकण्यात भारताला यश आलं तर दोन मॅच ड्रॉ झाल्या. 4 पैकी 3 वेळा तर नॉटिंघममध्येच भारताच्या फास्ट बॉलर्सनी सगळ्या 10 विकेट मिळवल्या. मागच्या इंग्लंड दौऱ्यातही भारताला नॉटिंघममध्ये विजय मिळाला होता, पण टीमने सीरिज 4-1 ने गमावली होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातली इंग्लंडमधली ही 19 वी सीरिज आहे. याआधी झालेल्या 18 सीरिजपैकी 3 सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर 14 सीरिज इंग्लंडने जिंकल्या. 2007 साली भारताला इंग्लंडमध्ये शेवटची सीरिज जिंकता आली. इंग्लंडमध्ये दोन्ही टीममधली ही 63 वी टेस्ट आहे. इंग्लंडने 34 टेस्ट जिंकल्या, तर टीम इंडियाला फक्त 7 टेस्ट जिंकता आल्या.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #पहलय #टसटमधय #टम #इडयच #वजय #नशचत #ह #आह #करण

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...