इंग्लंडच्या संबंधित दुखापत झालेल्या फलंदाजाचं नाव ओली पोप (Ollie Pope) असून त्याला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्याला मुकावं लागणार आहे. ओली पोप संघातून बाहेर झाल्यानं ज्यो रुटनं प्लेईंग इलेव्हनमध्ये जॉनी बेयरस्टोचा समावेश केला आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर बेयरस्टोला कसोटी क्रिकेट सामन्यात संधी देण्यात आली आहे. ओली पोपच्या ठिकाणी खेळवण्यासाठी इंग्लंडकडे बेयरस्टो आणि डॅन लॉरेन्स असे दोन पर्याय होते. पण पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून बेयरस्टोची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा-हिरव्यागार पिचमुळे भारताचं नुकसान का फायदा? असं आहे पहिल्या दिवसाचं हवामान
दुसरीकडे, भारताचा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल (Mayank Agrawal) हा देखील दोन दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त झाला आहे. सराव करत असताना त्याच्या डोक्याला चेंडू लागला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यानं चेंडू टाकल्यानंतर, अचानक चेंडूने जास्त उसळी घेतली. यामुळे तो चेंडू थेट मयांक अग्रवालच्या डोक्यावर जाऊन आदळला आहे. त्यामुळे मयांकला देखील पहिल्या कसोटी सामन्याला मुकावं लागणार आहे.
हेही वाचा-IND vs ENG : विराट-शास्त्रींसाठी दोन जागांची डोकेदुखी, अशी असणार Playing XI!
आजपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कडक निर्बंधात हा सामना खेळवला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे दोन्ही संघाना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#IND #ENG #पहलय #कसटआधच #इगलडल #मठ #धकक #दखपतमळ #महततवच #खळड #सघबहर